भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. केदार जाधवसोबत शतकी भागीदारी रचत धोनीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामना जिंकल्यानंतर सर्वच स्तरातून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत होता. सलग 3 सामन्यात 3 अर्धशतकं झळकावून धोनीने मालिकावीराचा किताबही पटकावला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना धोनीने फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना पाहताच आपल्या हातातला चेंडू त्यांच्याकडे सोपवला.

अवश्य वाचा – IND vs AUS : भारतीय क्रिकेटला वाहून घेतलेला धोनीइतका कोणीही नाही – विराट कोहली

यावेळी धोनी आणि बांगर यांच्यातला संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. “हा चेंडू पकडा, नाहीतर म्हणाल निवृत्त होतोयस का?”…धोनीच्या या वक्तव्यावर बांगर यांनीही त्याला दिलखुलासपणे दाद दिली. याआधी इंग्लंड दौऱ्यात वन-डे मालिकेदरम्यान धोनीने अशाच पद्धतीने चेंडू हातात घेत पंचांकडे दिला होता, यावेळी काही प्रसारमाध्यमांनी धोनी आता निवृत्त होतोय की काय असे अंदाज बांधले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात केली आहे. ऑस्ट्रेलियात भारत पहिल्यांदाच कसोटी आणि वन-डे मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत 5 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : ….तर निकाल वेगळाच लागू शकला असता !