scorecardresearch

Video : मुलीने बिअरच्या ग्लासमध्ये पकडला कॅच आणि … हा व्हिडीओ पहाच!

हा सामना रंगतदार झालाच. पण या सामन्यातील मुख्य आकर्षण ठरली ही तरुणी.

Video : मुलीने बिअरच्या ग्लासमध्ये पकडला कॅच आणि … हा व्हिडीओ पहाच!

एखादा सामना सुरु असताना फलंदाजाने फटकावलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये गेला आणि तो झेल त्यातील एखाद्याने पकडला, हे काही खेळात नवीन नाही. मात्र एका बेसबॉलच्या सामन्यात एक वेगळीच गोष्ट घडली. मंगळवारी सॅन दिएगो पेडर्स आणि अटलांटा ब्रेव्ह्स या दोन संघांमध्ये बेसबॉलचा सामना रंगला. या सामन्यात पेडर्स संघाने १४-१ असा ब्रेव्ह्स संघाचा धुव्वा उडवला. हा सामना रंगतदार झालाच. पण या सामन्यातील मुख्य आकर्षण ठरली ती एक तरुणी.

सामना सुरु असताना हि तरुणी स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये आरामात बसली होती. आणि आपल्या हातातील बिअरचा आस्वाद घेत होती. त्यावेळी अचानक बॅटरने मारलेला बेसबॉलचा चेंडू तिच्या दिशेने आला आणि अचानक चेंडू तिच्या अगदी जवळ आला. त्यावेळी प्रसंगावधान राखत तिने तो चेंडू बिअरच्या ग्लासमध्ये झेलला. तिची ही कृती पाहून आजूबाजूच्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि तिचे कौतुक केले.

पण हा सिलसिला इथेच थांबला नाही. प्रेक्षकांचे कौतुक स्वीकारून त्या तरुणीने जे पुढे केले, त्यामुळे तिने खऱ्या अर्थाने साऱ्यांचे लक्ष वेधले. तिने तो चेंडू पडलेला बिअरचा ग्लास हवेत उंच धरला. साऱ्यांना तो ग्लास दाखवला आणि त्यानंतर तीन ती बिअर एका घोटात संपवून टाकली. तिच्या या गोष्टीनंतर मात्र साऱ्यांनी दुप्पट टाळ्या वाजवल्या. काहींनी तर तिचे शूटिंगही केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2018 at 19:04 IST

संबंधित बातम्या