India A vs Australia A: ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय ए संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआयकडून) भारतीय ए संघ आणि इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. भारतीय ए संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. यासह त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यर पुढील ६ महिने रेड बॉल क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे तो केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर कक्ष केंद्रित करणार आहे.
श्रेयस अय्यर काही महिने दुखापतीमुळे संघांबाहेर होता. त्यानंतर त्याने पुनरागमन केलं आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. आता भारत ए संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे.
भारतीय ए संघ येत्या ३० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० स्प्टेंबरला कानपूरमध्ये रंगणार आहे. तर इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. हा सामना रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील चॅम्पियन संघ विदर्भ संघासोबत होणार आहे. हा सामना १ ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये रंगणार आहे.
पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय ए संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुरजापनीत सिंग, युद्धवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), सिमरनजीत सिंग, प्रियांश आर्य.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय ए संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधू, गुरजापनीत सिंग, युद्धवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग.
इराणी कप स्पर्धेसाठी असा आहे रेस्ट ऑफ इंडियाचा संघ: रजत पाटीदार (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, आर्यन जुयाल (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यश धूल, शेख रशीद, ईशान किशन (यष्टिरक्षक), तनुष कोटीयन, मानव सुथार, गुरनूर बराड, खलील अहमद, आकाशदीप, अंशुल कंबोज, सारांश जैन.