भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीची निवड केली आहे. यामध्ये भारताचे माजी खेळाडू अशोक मल्होत्रा ​​यांचीही निवड करण्यात आली होती. त्यांच्यासोबत जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचाही समावेश करण्यात आला आहे. अशोकसोबतच सुलक्षणा आणि जतीन यांनीही टीम इंडियासाठी क्रिकेट खेळले आहे. या तिघांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नसली तरी देखील मंडळाने त्यांना संधी दिली आहे.

बीसीसीआयने अशोक आणि जतीनचा सीएसीमध्ये नवीन सदस्य म्हणून समावेश केला आहे. तर सुलक्षणा यांना कायम ठेवण्यात आले आहे. यापूर्वीही त्या या समितीचा सदस्य होत्या. जतिनने भारतीय क्रिकेट संघासाठी ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या ९५ डावांमध्ये ३९६४ धावा केल्या आहेत. जतीनने या फॉरमॅटमध्ये १३ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या ४४ सामन्यात १०४० धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत.

टी२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील समितीची हकालपट्टी केली आणि त्यांच्या बदलीसाठी अर्ज मागवले. अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नवीन अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्ती प्रक्रियेत सहभागी होणार आहे.

हेही वाचा :   राहुल, अय्यर, पंत एकाचवेळी खेळू शकतात? बांगलादेश दौऱ्याआधी माजी निवडसमिती सदस्याचे मोठे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीसीसीआयने ही घोषणा प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज (दि. १ डिसेंबर) रोजी केली. अशोक मल्होत्रा यांनी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला. तर जतीन परांजपे हे भारताच्या वरिष्ठ पुरूष संघाच्या निवडसमितीमधील एक सदस्य होते. लुलक्षणा नाईक या मदन लाल यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीमधील एक सदस्या आहेत.