BCCI new Selectors: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्य निवड समितीमध्ये आगामी काळात बदल दिसू शकतात. बीसीसीआयने राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज मागवले आहेत. अजित आगर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीमध्ये एकूण पाच सदस्य आहेत. सध्या एकही जागा रिक्त नाही. त्याचबरोबर एकाही सदस्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. अशा स्थितीत सध्याच्या निवड समितीतील कोणाला तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

बीसीसीआयने या पदासाठी काही अटीशर्ती ठेवल्या आहेत. बोर्डाने म्हटले आहे की, निवडकर्ता पदासाठी सात कसोटी आणि ३० प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येतील. इच्छुकांनी २५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करावेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, बीसीसीआय शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावेल. आत्तापर्यंत, मुलाखतीची तारीख निश्चित केलेली नाही.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
chandrapur lok sabha marathi news
“सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या”, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांचे मत; म्हणाल्या…
Maharashtra Government, Freezes, Ready Reckoner Rates, for 2024 - 2025,lok sabha 2024, elections, house buyers, land, maharashtra, marathi news,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’
rachana banerjee hugali loksabha
‘सूर्यवंशम’ अभिनेत्री रचना बॅनर्जींनी लोकसभा जिंकण्यासाठी कसली कंबर; उमेदवारी देण्यामागे ममतादीदींचे गणित काय?

निवड समितीमध्ये कोण आहेत?

सध्याच्या निवड समितीमध्ये अजित आगरकर मुख्य निवडकर्ता आहेत. त्याच्याबरोबर माजी सलामीवीर फलंदाज शिव सुंदर दास, माजी वेगवान गोलंदाज सुबार्तो बॅनर्जी, सलील अंकोला आणि माजी फलंदाज श्रीधरन शरथ आहेत. आगरकर वगळता कोणत्याही एका व्यक्तीला नारळ दिला जाऊ शकतो. यात काही सदस्यांना या निवड समितीत खूप कालावधी झाला आहे.

हेही वाचा: Ishan Kishan: “तू देशासाठी खेळत आहेस…”, माजी पाकिस्तानी खेळाडूने मानसिकदृष्ट्या थकलेला इशान किशनला मारला टोमणा

उत्तर विभागातील सदस्य नाही

बीसीसीआय निवड समितीमध्ये सलील अंकोला यांना काढले जाऊ शकते, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. माध्यमांमध्ये अंकोला यांचे नाव पुढे आले आहे. तो निवड समितीमध्ये पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतो. समितीत या भागातील दोन सदस्य आहेत. आगरकरही पश्चिमेकडील प्रदेशातून येतात. अशा स्थितीत अंकोला यांना पदावरून पायउतार व्हावे लागू शकते. सध्या उत्तर विभागातून निवड समितीमध्ये कोणीही नाही. अशा परिस्थितीत या क्षेत्रातून कोणाची तरी निवड समितीत वर्णी लागू शकते. अजित आगरकरपूर्वी चेतन शर्मा मुख्य निवडकर्ता होते. स्टिंग ऑपरेशननंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. यानंतर तीन कसोटी सामन्यांसाठी निवड होणे बाकी आहे. त्यानंतर आयपीएलच्या मध्यावर होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी निवडकर्त्यांना संघाची निवड करावी लागेल. त्याआधी या पदासाठी कोणाची नियुक्ती उत्तर भागातून होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: Prakhar Chaturvedi: कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने रचला मोठा इतिहास! कूचबिहार ट्रॉफीमध्ये ठोकल्या ४०० धावा

भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत २-०ने घेतली आघाडी

सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत सर्व गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १५.४ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित सलग दुसऱ्या टी-२०मध्ये खातेही न उघडता बाद झाला. त्याचवेळी १४ महिन्यांनंतर टी-२०मध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने १६ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने २९ धावांची खेळी केली. शिवम दुबेसह यशस्वी जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. यशस्वीने ३४ चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ६८ धावांची तुफानी खेळी केली. जितेशला खाते उघडता आले नाही. त्याचवेळी दुबेने ३२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या, तो ९ नाबाद राहिला. रिंकू ९ धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून करीम जनातने दोन गडी बाद केले. तर फजलहक फारुकी आणि नवीन-उल-हक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.