Ishan Kishan on Team India: भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन याने मानसिक थकव्याचे कारण देत खेळातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यावर पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज कमरान अकमल याने युवा खेळाडू किशनवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. किशनने डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघासाठी उपलब्ध असणार नाही, हे सांगितले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेसाठी यष्टिरक्षक-फलंदाजकडे दुर्लक्ष करण्यात आले. या विषयावर बोलताना भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, खेळाडूने स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध करून दिलेले नाही आणि आता किशनला संघात परत येण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून इशानला वळगळले

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही किशनला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. के.एस. भरत आणि तरुण ध्रुव जुरेल इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी यष्टीरक्षक म्हणून संघात असतील. अकमलने किशनवर त्याच्या कारकिर्दीत इतक्या लवकर ब्रेक घेतल्याबद्दल टीका केली आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारख्या दिग्गजांना देखील अशाच मानसिक थकवाचा सामना करावा लागला होता, असेही तो म्हणाला.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
You are playing for the country ex-Pakistani cricketer Kamran Akmal taunts mentally exhausted Ishan Kishan

हेही वाचा: IND vs AFG: रोहित शर्माच्या खराब फलंदाजीवर आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित; म्हणाला, “त्याच्या फॉर्म आणि क्षमतेबद्दल शंका…”

अकमलने इशानवर निशाणा साधला

अकमल त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “इशान किशनने मानसिक थकव्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्याने संघापासून स्वतःला वेगळे केले होते आणि यामुळे क्रिकेट वर्तुळात खूप चर्चा होत आहे. तुमच्या करिअरच्या या सुरुवातीच्या टप्प्यावर तुम्हाला कोणत्या मानसिक थकव्याचा सामना करावा लागत असेल? या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू आहेत जे थकवा खूप चांगल्या प्रकारे हाताळतात. ते आयपीएल, कसोटी सामन्यांसह आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. या कारणासाठी खेळाडूंनी कधी ब्रेक घेतल्याचे ऐकिवात नाही.”

हेही वाचा: IND vs AFG: अक्षर पटेलने टी-२० मध्ये २०० विकेट्सचा गाठला टप्पा; म्हणाला, “मी हा विक्रम विसरून…”

माजी खेळाडू अकमल पुढे म्हणाला की, “किशनचा विश्रांती घेण्याचा निर्णय माझ्या समजण्यापलीकडचा आहे. युवा खेळाडूंनी त्यांच्या करिअरमध्ये इतक्या लवकर अशा मागण्या करू नयेत.” तो पुढे म्हणाला, “आयपीएल दोन महिन्यावर असल्याने तुम्ही स्वत:ला वाचवत आहात. भारतीय संघात खेळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही सबब माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. मला वाटते की निवड समितीने इशान किशनला या संघापासून दूर ठेवून चांगले काम केले आहे. त्याला आता विश्रांती द्या आणि मग देशांतर्गत क्रिकेट खेळायला सांगा. हा खेळाडूंना एक संदेश असावा की मानसिक थकव्यामुळे ते हवे तेव्हा विश्रांतीची मागणी करू शकत नाहीत. देशासाठी खेळ खेळणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. तुम्ही त्यावेळी आरामाची मागणी करू शकत नाही.