भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उच्च व्यवस्थापन समितीमध्ये मंगळवारी मोठे बदल जाहीर करण्यात आले. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी विश्वचषक विजेता खेळाडू रॉजर बिन्नी यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय अनेक पदांवरही बदल करण्यात आले. मात्र, जय शाह यांनी सलग दुसऱ्यांदा बीसीसीआयचे सचिवपद कायम राखले. दरम्यान, एका रिपोर्टनुसार बीसीसीआयमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, टी२० विश्वचषकानंतर चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयची निवड समितीत मोठे बदल होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर लवकरच बदल करू शकते.

टी२० विश्वचषकातील कामगिरीवर लक्ष

अलीकडच्या काळात चेतन आणि त्याच्या पॅनलची कामगिरी संघ निवडीच्या बाबतीत सातत्यपूर्ण राहिलेली नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, टी२० विश्वचषकात भारताची कामगिरी कशी होते यावर बरेच काही अवलंबून असेल. बोर्डातील बहुतेक लोक चेतनवर खूप खुश आहेत. पण जोपर्यंत बीसीसीआय नवीन क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) निवडत नाही तोपर्यंत तो तिथे असेल.

हेही वाचा :   बीसीसीआयने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये, पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी साधला जय शाह यांच्यावर निशाणा

चेतन शर्मा यांना त्यांचे पद जाणार का राहणार यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. परंतु पूर्व विभागाचे प्रतिनिधी देबाशीष मोहंती यांना काही महिन्यांत पद सोडावे लागेल याचे कारण, त्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ निवड समितीमध्ये एकूण चार वर्षे पूर्ण केली आहेत. अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “अभय कुरुविलाला लागू असलेला नियम मोहंती यांनाही लागू होईल. करुविलाच्याय देबू मेहंती यांच्यावरही एक नियम लागू होईल. २०१९ च्या सुरुवातीला देबूंना अध्यक्षांनी जूनियर पॅनलमध्ये सामील केले होते. त्याठिकाणी त्यांनी दोन वर्ष काम केले होते. देवांग गांधींना स्वतःचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर देबूंना सीनियर पॅनलमध्ये पाठवले गेले होते,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.”

हेही वाचा :  T20 World Cup2022: टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लड संघाला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख गोलंदाज स्पर्धेला मुकणार 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की २४ डिसेंबर २०२० रोजी नवीन बीसीसीआय निवड समितीची घोषणा करण्यात आली आणि त्यावेळी भारतासाठी विश्वचषकात पहिली हॅटट्रिक घेणारा गोलंदाज चेतन शर्माला त्याचे प्रमुख बनवण्यात आले. तर देबाशिष मोहंती आणि अभय कुरुविला यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे.