अमृतसर : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या विशेष निमंत्रणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानात दाखल झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघ २००८ मध्ये अखेरचा पाकिस्तानात खेळला होता, तर २००६ मध्ये या दोघांच्यात पाकिस्तानात अखेरची द्विपक्षीय मालिका खेळली गेली. आशिया चषक स्पर्धेत ‘बीसीसीआय’ने पाकिस्तानात खेळण्यास ठाम नकार दिला. त्यानंतर ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवली जात आहे. पाकिस्तानातील चार सामन्यांसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांना पाकिस्तानभेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणाचा स्वीकार करूनच बिन्नी आणि राजीव शुक्ला हे दोघे सोमवारी वाघा सीमा पार करून पाकिस्तानात दाखल झाले.

पाकिस्तानातील पंजाब परगण्याच्या राज्यपालांनी खास मेजवानीचे आयोजन केले असून, यासाठी या दोघांसह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या तीनही देशांचे संघ उपस्थित राहणार आहेत. ‘‘ही औपचारिक भेट असून, याला कुणी राजकीय रंग देऊ नये. राजकारण आणि क्रिकेटची सरमिसळ करू नये,’’ असे शुक्ला यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा >>>IND vs NEP: रोहित-शुबमनची शानदार अर्धशतके! १० गडी राखून भारताने दुबळ्या नेपाळचा केला सुपडा साफ, सुपर ४ पोहचली टीम इंडिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भेटीनंतर पाकिस्तानबरोबर पुन्हा द्विपक्षीय लढती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ‘‘भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या द्विपक्षीय मालिकेविषयी निर्णय फक्त भारत सरकारच घेऊ शकते. सरकारच्या निर्णयाबाहेर आम्ही जाणार नाही,’’ असे शुक्ला म्हणाले.