Rajasthan Royals Head Coach: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविड यांनी या पदावरून माघार घेतल्यानंतर आता आगामी हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येणार आहे. राजस्थान रॉयल्सने पोस्ट शेअर करत अधिकृत घोषणा केली आहे.

कुमार संगकारा गेल्या काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा महत्वाचा भाग आहे. तो गेल्या काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघासाठी क्रिकेट डायरेक्टरची भूमिका पार पाडत आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता ही जबाबदारी देखील कुमार संगकाराकडे सोपवण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सने ११ वाजून ११ व्या मिनिटाला ही घोषणा केली. ११ नंबरसोबत कुमार संगकाराचं खास कनेक्शन आहे. त्याचा जर्सी नंबर देखील ११ होता. कुमार संगकाराची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होताच राजस्थान रॉयल्सने कुमार संगकारच्या हटके एंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होण्याआधी सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून संघातील प्रमुख सदस्य असणाऱ्या संजू सॅमसनने या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या ट्रेड डिलनुसार संजू सॅमनस चेन्नई सुपर किंग्ज संघात तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला आहे. जडेजासह सॅम करण आणि डोनोवन फरेराचा देखील राजस्थान रॉयल्स संघात समावेश करण्यात आला आहे.

आएपीएल २०२६ स्पर्धेच्या लिलावासाठी रिटेन केलेले खेळाडू

शुभम दुबे, रवींद्र जडेजा (ट्रेड इन), सॅम करन (ट्रेड इन) शिमोरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, ल्युहान डी प्रिटोरस, वैभव सूर्यवंशी, डोनाव्हन फरेरा (ट्रेड इन),नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, क्वेना मफाका.


आएपीएल २०२६ स्पर्धेच्या लिलावासाठी रिलीज केलेले खेळाडू

संजू सॅमसन (ट्रेडआऊट), नितीश राणा (ट्रेडआऊट), वानिंदू हासारंगा, महेश तीक्षणा, फझलक फरुकी, आकाश मढवाल, अशोक शर्मा, कुणाल राठोड, कुमार कार्तिकेय</p>