Canadian cricketer Daniel McGahey retired after the ICC banned transgender cricketers : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २१ नोव्हेंबर रोजी एका ऐतिहासिक निर्णयात ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंवर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासांनी कॅनडाची क्रिकेटर डॅनियल मॅकगहेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. डॅनियल मॅकगहे या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरली होती. मॅकगहेने आयसीसीच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आणि आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टमध्ये डॅनियल मॅकगहे म्हणाली की, मंगळवारी आयसीसीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. डॅनियल मॅकगहे म्हणाली, “आज सकाळी आयसीसीच्या निर्णयानंतर, मला जड अंतःकरणाने सांगायचे आहे की माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपली आहे. तो जसा सुरू झाला तितक्या लवकर संपला पाहिजे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, सर्व विरोधी संघाचे, क्रिकेट समुदायाचे आणि प्रायोजकांसह माझ्या प्रवासाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”

निवृत्तीची घोषणा करताना ती म्हणाली, ‘आयसीसीच्या निर्णयावर माझे स्वतःचे मत आहे की, आज जगभरातील लाखो ट्रान्स महिलांना एक संदेश पाठवण्यात आला, ज्यामध्ये आम्हाला कोणतेही अधिकार नाहीत, असे म्हटले आहे. मी वचन देते की खेळातील समानतेसाठी मी कधीही लढणे बंद करणार नाही. आम्हाला सर्वोच्च पातळीवर क्रिकेट खेळण्याचा अधिकार आहे. या खेळाच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला आम्ही कोणताही धोका नाही.’

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये कशी असेल भारताची प्लेइंग-११? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॅनियल मॅकगहे कोण आहे?

मॅकगहेचा जन्म एप्रिल १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियात झाला. २६ व्या वर्षी तिने फेब्रुवारी २०२० मध्ये कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. मॅकगहेने मे २०२१ मध्ये तिने वैद्यकीय संक्रमण सुरू केल्यानंतर लगेचच क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द सुरू करण्याचा निर्णय घेतला.मात्र, कॅनडाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर डॅनियलला कॅनडाच्या महिला क्रिकेट संघात संधी मिळाली. त्यानंतर कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात सामील होणारी डॅनिएल ही पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटर बनली. तिने २०२३ महिला टी-२० राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिच्या संघ कॅनडासाठी चमकदार कामगिरी केली, फलंदाजीच्या केवळ ३ डावात २३७ धावा केल्या होत्या.