scorecardresearch

Chetan Sharma Salary : चेतन शर्मांना BCCI देतं इतका पगार, स्टिंग ऑपरेशनमुळे होणार कोट्यवधींचं नुकसान

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत.

chetan sharma salary
एका वृत्तवाहिनीने चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. (PC : Indian Express)

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचं नुकतंच एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं आहे. या स्टिंग ऑपरेशनदरम्यान त्यांनी भारतीय संघ आणि बीबीसीआयबाबत अनेक धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराटला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तसेच जसप्रीत बुमराहची दुखापत, हार्दिक पांड्याचं करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली वक्तव्ये ऐकून भारतीय क्रिकेटरसिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय लवकरच चेतन शर्मांवर कारवाई करू शकतं. माजी जलदगती गोलंदाज आणि मुख्य निवडकर्त्यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे. निवडकर्त्याचं पद गेलं तर शर्मा यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. कारण निवड समितीचे अध्यक्ष असल्याने बीसीसीआयकडून शर्मा यांना गलेलठ्ठ पगार दिला जातो, जो आता मिळणार नाही.

चेतन शर्मा यांच्या खिशाला कात्री

चेतन शर्मा यांना बीसीसीआयकडून वर्षाला तब्बल १.२५ कोटी रुपये इतका पगार दिला जातो. जगातल्या कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्याला इतका पगार मिळत नाही. शर्मा यांच्या पगाराची माहिती टीव्ही ९ भारतवर्षने प्रसिद्ध केली आहे. आयडल नेटवर्थच्या रिपोर्टनुसार शर्मा यांची नेट वर्थ ५ मिलियन डॉलर्स (४१ कोटी रुपये) इतकी आहे. परंतु स्टिंग ऑपरेशननंतर आता शर्मा यांची खुर्ची धोक्यात आहे. त्यांना निवड समितीतून हटवल्यानंतर त्यांचा हा पगार बंद होईल. त्यामुळे त्यांना या स्टिंग ऑपरेशनचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

हे ही वाचा >> Cheteshwar Pujara: १०० व्या कसोटीपूर्वी पंतप्रधान मोदींनी चेतेश्वर पुजाराला दिला विजयाचा मंत्र, जाणून घ्या दोघांमध्ये काय घडले

स्टिंग ऑपरेशनमधील चेतन शर्मा यांचे आरोप

खेळाडू ८० ते ८५ टक्के फिट झाल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी इंजेक्शन घेतात
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करण्यावरून संघ व्यवस्थापनाशी मतभेद होते. बुमराहला अजूनही संघात संधी मिळालेली नाही.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या भांडण झालं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 12:30 IST