दादर युनियन वास्तूचे नूतनीकरण
दादर युनियन म्हणजे मुंबईतले क्रिकेटचे विद्यापीठ. या विद्यापीठाने भारताला सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे दर्जेदार गुणी क्रिकेटपटू दिले. कालौघात या विद्यापीठाचे वैभव लोपले होते, मात्र भारताचे माजी कर्णधार आणि दादर युनियनचे मान्यवर विद्यार्थी दिलीप वेंगसरकर यांनी हे गतवैभव पुन्हा साकारण्याचे ठरवले. त्यांच्या प्रयत्नांना साथीदारांची भक्कम साथ लाभली आणि उभी राहिली दादर युनियनची हक्काची वास्तू. रविवारी संध्याकाळी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. माजी क्रिकेटपटू वासू परांजपे आणि संजय मांजरेकर यांनी युनियनच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव मंत्री, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
क्रिकेटच्या विद्यापीठाला झळाळी
दादर युनियन वास्तूचे नूतनीकरण दादर युनियन म्हणजे मुंबईतले क्रिकेटचे विद्यापीठ. या विद्यापीठाने भारताला सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे दर्जेदार गुणी क्रिकेटपटू दिले. कालौघात या विद्यापीठाचे वैभव लोपले होते, मात्र भारताचे माजी कर्णधार आणि दादर युनियनचे मान्यवर विद्यार्थी दिलीप वेंगसरकर यांनी हे गतवैभव पुन्हा साकारण्याचे ठरवले. त्यांच्या प्रयत्नांना साथीदारांची भक्कम साथ लाभली आणि उभी
First published on: 26-12-2012 at 04:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket university renovation