भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गावसकर यांच्या आईचे निधन झाले असून त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या आई मीनल गावसकर यांचे रविवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. सुनील गावसकर यांच्या आईचे वय ९५ वर्षे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील गावसकर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर समालोचन करत असताना, त्यांच्या आई मीनल गावसकर यांचे निधन झाले. सुनील गावस्कर यांचे वडील मनोहर गावसकर यांचे २०१२ मध्ये बंगळुरू येथे त्यांच्या बहिणीच्या घरी निधन झाले होते.

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामातील बाद फेरीच्या सामन्यांसाठी गावसकर समालोचन करू शकले नव्हते. कारण ते त्यांच्या आजारी आईला भेटायला गेले होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या समालोचनासाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये उपस्थित होते.

सुनील गावसकर यांच्या आईचे निधन झाले, तेव्हा ते बांगलादेशमध्ये समालोचन करत होते. जिथे श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर भारताला बांगलादेशविरुद्ध तीन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला.

हेही वाचा – IND vs BAN 2nd Test: बांगलादेशी चाहत्याला आश्विनशी पंगा घेणे पडले महागात; फिरकी मास्टरने केली अशी फजिती की…

आपल्या खेळाच्या कारकिर्दीच्या समाप्तीपासून, गावस्कर सतत समालोचन करत आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात येत-जात आहेत. गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकरची खेळण्याची कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही, पण आता तो कॉमेंट्रीमध्येही चांगली लोकप्रियता मिळवत आहे. रोहन मुख्यतः देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer sunil gavaskars mother meenal passed away at the age of 95 in mumbai vbm
First published on: 26-12-2022 at 10:19 IST