David Teeger removed as South Africa captain : पॅलेस्टाईनबरोबर सुरू असलेल्या संघर्षात इस्रायली सैन्याच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्यांनंतर, डेव्हिड टिगरला विश्वचषकाच्या एक आठवडा आधी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका १९ जानेवारीपासून सुरू होणार्‍या स्पर्धेपूर्वी तयारी करत आहे. सीएसएने सांगितले की, टीगरला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय सर्व खेळाडू, एसए अंडर-१९ संघ आणि स्वतः डेव्हिड यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. तो एक खेळाडू म्हणून संघाबरोबरच राहील आणि योग्य वेळी नवीन कर्णधाराची नियुक्ती केली जाईल.

दक्षिण आफ्रिकेची मोहीम पुढील शुक्रवारी पॉचेफस्ट्रूममध्ये सुरू होईल, जिथे ते वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळतील. त्यानंतर इंग्लंड आणि स्कॉटलंडविरुद्ध सामने होतील. गेल्या नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेतून हलविण्यात आलेली ही स्पर्धा बेनोनी येथेही खेळली जाईल, जे सेमीफायनल आणि फायनलचे आयोजन करतील. ब्लूमफॉन्टेन आणि किम्बर्ले येथील ठिकाणांवर सीएसएला निदर्शने होण्याची शक्यता वाटत आहे.

Hardik Pandya Confirms Divorce With Natasha Stankovic
Hardik Pandya Natasha Separation : “जब मुझे रोना भी था…” पत्नी नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिकचं ‘ते’ वक्तव्य व्हायरल
Hardik pandya
हार्दिक पंड्या: दुखापत, ट्रेडऑफ, ट्रोलिंग, वर्ल्डकपविजेता, कर्णधारपद नाही, घटस्फोट- सहा नाट्यमय महिन्यांची सफर
The Twenty20 team is led by Suryakumar sport news
ट्वेन्टी२० संघाचे सूर्यकुमारकडे नेतृत्व; हार्दिक उपकर्णधारपदापासूनही दूरच
सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने
सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने
PV Sindhu opinion is that golden success is the only goal in Olympics sport news
ऑलिम्पिकमध्ये सोनेरी यशाचेच ध्येय -सिंधू
Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce
हार्दिक पंड्याने घटस्फोटावर केलं शिक्कामोर्तब; नताशा मुलाला घेऊन जाताच पोस्ट शेअर करत म्हणाला, “४ वर्षांनी अखेरीस..”
suryakumar yadav
India vs Sri Lanka T20 ODI Series : सूर्यकमार यादव नवा टी-२० कर्णधार; रोहित-विराट वनडे मालिका खेळणार, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
Kumar Sangakkara played with Sanju Samson bat
Sanju Samson : कुमार संगकारा वापरतोय माझी बॅट! संजू सॅमसनची खास पोस्ट, राजस्थान रॉयल्सने शेअर केला VIDEO
Smriti Mandhana today celebrating 28th birthday
Smriti Mandhana Birthday : जिच्या एका स्माइलने चाहते घायाळ होता, ती ‘नॅशनल क्रश’ कोणाला करतेय डेट? जाणून घ्या

सीएसएने म्हटले आहे की, “या स्वरूपाच्या सर्व घटनांप्रमाणेच, सीएसएला विश्वचषकाच्या संदर्भात नियमित सुरक्षा आणि जोखीम अपडेट्स मिळत आहेत. आम्हाला गाझामध्ये स्पर्धेच्या ठिकाणी सुरू असलेल्या युद्ध-संबंधित निदर्शनांबद्दल सूचित केले गेले आहे. आम्हाला असेही सूचित करण्यात आले आहे की ते एसए अंडर-१९ कर्णधार डेव्हिड टीगरच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यांच्यामुळे विरोधकांच्या प्रतिस्पर्धी गटांसह संघर्ष किंवा हिंसा देखील होऊ शकते, असा धोका आहे.”

हेही वाचा – BBL : डेव्हिड वॉर्नरची क्रिकेटच्या मैदानात बॉलीवूडच्या हिरोसारखी एन्ट्री, हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा VIDEO व्हायरल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला होता. त्याचवेळी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटीपूर्वी पॅलेस्टाईन समर्थक गटाने मोठा गोंधळ घातला होता. त्यांनी न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमबाहेर इस्रायलविरोधी घोषणा दिल्या आणि यजमान संघाचा अंडर-१९ कर्णधार डेव्हिड टिगरला बडतर्फ करण्याची मागणी केली होती. कारण टिगरने इस्त्रायली लष्कराचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते.

आंदोलकांच्या एका छोट्या गटाने “वर्णभेदी इस्रायलवर बहिष्कार घाला” आणि “वर्णभेदी इस्रायलचा नाश करा” असे फलक हातात घेतले होते. या आंदोलकांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीसाठी घोषणाही दिल्या होत्या. त्याचबरोबर स्टेडियमबाहेर या आंदोलकांनी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ कर्णधाराच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती.

हेही वाचा – IND vs AFG : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

एक आंदोलक म्हणाला होता, ‘डेव्हिड टिगर, तू आमच्या देशाचा कर्णधार होण्याच्या पात्रतेचा नाहीस. टिगरला गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात ‘रायझिंग स्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यानंतर तो म्हणाला होता, ‘मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता हो आता मी ‘रायझिंग स्टार’ आहे, पण खरे ‘रायझिंग स्टार्स’ हे इस्रायलमधील तरुण सैनिक आहेत.’