James Anderson Appreciated by Darren Gough : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा अनुभवी क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने मोठा खुलासा केला आहे. यूएईमध्ये त्याच्या सराव शिबिराच्या आधी मँचेस्टरमध्ये कठोर प्रशिक्षण घेत असताना त्याने नवीन रन-अपवर काम केले. ४१ वर्षीय अँडरसनने ठळकपणे सांगितले की, गेल्या वर्षी मायदेशातील अॅशेस मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. अशा परिस्थितीत त्याला भारतात यश मिळावे यासाठी किरकोळ बदल करायचे होते. यावर आता डॅरेन गॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॅरेन गॉफ यांनी अँडरसनच्या चिकाटीचे आणि वयाबरोबर दुखापतीचा धोका असतानाही खेळणे सुरू ठेवण्याच्या त्याच्या इच्छेचे कौतुक केले. त्याचबरोबर वरिष्ठ वेगवान गोलंदाजाच्या समर्पणावर प्रकाश टाकला. गॉफ म्हणाले, “हे फक्त खेळत राहण्याची इच्छा दर्शवते. फक्त एकच गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इतके दिवस काहीतरी करत असता, जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाज असता तेव्हा तुम्हाला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते.”
अँडरसन किती दिवस खेळणार?
गॉफ, जे सध्या यॉर्कशायरचे क्रिकेट संचालक आहे, त्यांनी अँडरसनच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याविषयीच्या अनुमानांबद्दल सांगितले की, जर त्याने इंग्लंडसाठी विकेट्स घेणे सुरू ठेवले, तर त्याच्या खेळण्याच्या शक्यतांवर वयाचा फारसा प्रभाव पडत नाही. ते म्हणाले, “मला वाटते की या वयातही तो चांगली कामगिरी करू शकतो. प्रत्येकजण त्याच्या वयाबद्दल बोलतो, परंतु जिमीच्या बाबतीत तुम्हाला वय बाजूला ठेवावे लागेल. जर तो विकेट घेत राहिला, तर तो खेळत राहील. जर त्याने विकेट घेतल्या नाही, तर ते खेळणार नाही. हे स्पष्ट आहे.”
हेही वाचा – IND vs ENG : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लडचा संघ हैदराबादमध्ये दाखल, पाहा VIDEO
गॉफ पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्हाला दुखापत होऊ लागते, तेव्हा ते तुमचा पाठलाग करतात. पण तुमचा रन-अप बदलणे? हे विलक्षण असू शकते. परंतु जेव्हा तुम्ही तुमची गतिशीलता बदलता, तेव्हा त्यामुळे कोणत्याही दुखापती होऊ शकतात.”
हेही वाचा – VIDEO : सचिन तेंडुलकर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल
अँडरसनने इंग्लंडच्या २०२१ च्या भारत दौऱ्यात तीन कसोटी सामन्यात आठ विकेट्सह घेतल्या होत्या, ज्यामध्ये चेन्नईतील सामन्यात तीन विकेट्स घेतल्या. गॉफ म्हणाले, “त्याने स्वत:ला खूप खडतर दौऱ्यासाठी तयार केले आहे, जेव्हा तुम्ही भारतात जाता तेव्हा वेगवान गोलंदाजासाठी ते अवघड असते. पण जर ही मालिका त्याच्यासाठी चांगली गेली, तर तो पुढे खेळू शकतो. जर त्याने चांगली कामगिरी केली नाही, तर इंग्लंड क्रिकेटला निर्णय घ्यावा लागेल.”