Delhi Capitals buy Australia’s Annabelle Sutherland : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी झालेल्या लिलावात, दिल्ली कॅपिटल्स संघाने २२ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडवर खूप पैसे खर्च केले आणि तिला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. या लिलावासाठी ॲनाबेलची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. मात्र, तिच्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली.

मुंबईनेही ॲनाबेलसाठी जोरदार बोली लावली, पण जेव्हा दिल्ली फ्रँचायझीने तिच्यासाठी दोन कोटींची बोली लावली, तेव्हा मुंबईने शरणागती पत्करली आणि लिलावात उपस्थित असलेल्या आकाश अंबानीने हात वर केले. यानंतर ॲनाबेल दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाली. त्यामुळे आगामी हंगामात ती दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. यावेळी दिल्ली संघाने १५ खेळाडूंना रिटेन करून ३ खेळाडूंना सोडले होते.

Navi Mumbai, Motorists,
नवी मुंबई : दंड कमी करण्यासाठी वाहनचालकांची लोकअदालतीमध्ये धाव
Punjab and haryana court
ऑस्ट्रेलियात हुंड्यासाठी छळ, भारतात गुन्हा दाखल; पण न्यायलयाने रद्द केला FIR, कारण काय? न्यायमूर्ती म्हणाले…
sudhir mungantiwar mumbai rains
सहा तासांच्या पावसांत मुंबईची तुंबई; दुबई-न्यूयॉर्कची उदाहरणं देत मुनगंटीवारांकडून महापालिकेचा बचाव
Arshdeep Singh's grand welcome in Mohali
Team India : अर्शदीप सिंगचे मोहालीत ‘ग्रँड वेलकम’, ढोल-ताशांच्या गजरातील जंगी स्वागताचा VIDEO व्हायरल
Mumbai woman gifted a gold chain of 2 and half lakh rupees for pet dog
VIDEO : कुत्र्यासाठी केली चक्क अडीच लाखाची सोनसाखळी! मुंबईच्या महिलेने वाढदिवसाला दिली अनोखी भेट, पाहा व्हिडीओ
Virat Rohit Awesome Dance Video
विराट-रोहितचे पाय थिरकले अन् संपूर्ण टीम इंडियाने डान्स करत केलं भन्नाट सेलिब्रेशन; वानखेडेवरील व्हायरल VIDEO
Team india Victory Parade Updates open bus road show at Marine Drive and Wankhede
Team India Celebration : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत जंगी तयारी, वानखेडेवर चाहत्यांना मोफत प्रवेश, पाहा VIDEO
Sreesanth Slams Riyan Parag For Not Supporting India In T20 World Cup 2024
“आधी देशभक्त हो…”, रियान परागच्या वादग्रस्त वक्तव्यावर श्रीसंत संतापला; पण नेमकं काय घडलं?

दिल्लीने ॲनाबेलसाठी केली पर्स रिकामी –

या लिलावात उतरण्यापूर्वी दिल्ली संघाच्या पर्समध्ये २ कोटी २५ लाख रुपये होते. या संघाने ॲनाबेलवर बोली लावत तिला २ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे दिल्ली संघाची पर्स जवळजवळ रिकामी झाली. दिल्ली संघाकडे केवळ ३ स्लॉट असले, तरी त्यांनी आपला संघ आणखी मजबूत करण्यासाठी ॲनाबेलच्या रूपाने मोठी बोली लावली.

हेही वाचा – WPL 2024 Auction : मिनी लिलावात फोबी लिचफिल्ड ठरली पहिली करोडपती, गुजरात जायंट्सने एक कोटींना घेतले विकत

दिल्लीच्या संघाने ॲनाबेलवर उगीच एवढी मोठी बोली लावली नाही. ॲनाबेल ही ऑस्ट्रेलियाची एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे, जी बॉल आणि बॅट दोन्हीसह संघासाठी उपयुक्त ठरू शकते. तिने कांगारू संघासाठी आतापर्यंत २२ टी-२० सामने खेळले असून १० डावात तिने १४४.७७ च्या स्ट्राईक रेटने ९७ धावा केल्या आहेत. तसेच २२ सामन्यांच्या १० डावात गोलंदाजी करताना, तिने १० विकेट्स घेतल्या आहेत. तिची सर्वोत्तम कामगिरी २८ धावांत ३ विकेट्स आहे.

हेही वाचा – ZIM vs IRE : सिकंदर रझा आयरिश खेळाडूंशी भिडला; लाइव्ह सामन्यात बॅट घेऊन मारायलाही धावला, पाहा VIDEO

दिल्ली कॅपिटल्स संघ –

ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिजने कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तान्या भाटिया, तीतास साधू, ॲनाबेल सदरलँड.