India vs South Africa 1st Test Match, Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू डॉक्टर अली बाचर यांनी अलीकडेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार बाचर वयाच्या ८१व्या वर्षी अजूनही क्रिकेट खेळतात. त्यांचा भारतीय क्रिकेटशी खूप जुना संबंध आहे आणि ज्या खेळाडूंचा ते सर्वात जास्त आदर करतात त्याबद्दल विचारले असता, तेंडुलकर त्यांच्या यादीत अव्वल आहे.

तेंडुलकरचे वर्णन “वेगळ्या ग्रहातील माणूस” असे करताना, बाचर केवळ तेंडुलकरच्या अविश्वसनीय खेळीवरच नव्हे तर त्याच्या अनुकरणीय व्यक्तिमत्त्वावरही भर देतात. त्याने सचिनची तुलना ब्रायन लाराशी केली आणि सचिनला एक चांगला खेळाडू म्हटले आहे. आजच्या भारतीय संघाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “विराट कोहली हा आजचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियन स्पिरिटशी समांतर कामगिरी करत भारतीय संघात लढाऊ भावना निर्माण केली, याबद्दल कोहलीचे कौतुक करत करतो.”

बाचर पुढे म्हणाले, “कर्णधार म्हणून टीम इंडियाला एक उत्कृष्ट सलामीवीर मिळाला आहे. पहिल्या दिवसापासून कोहली संघाबरोबर आहे. भारतीय संघाकडे विराट कोहली आहे, जो आजचा सर्वोत्तम फलंदाज आहे.सेंच्युरियनमधील पराभवानंतरही कोहलीने हा संघ बनवला आहे. भारताने कसोटीत आणखी सुधारणा करावी असे मला वाटते कारण, मला भारताबाबत नेहमीच आदर वाटतो.” माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “कोहलीला बघून मला एक ऑस्ट्रेलियन लढाऊ बाणा आठवतो. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. आज तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.”

हेही वाचा: NZ vs BAN: न्यूझीलंडमध्ये टी-२०मालिका जिंकण्याचे बांगलादेशचे स्वप्न अधुरे, किवी संघाने विजय मिळवत वर्षाचा शेवट केला गोड

शार्दुल पहिल्या कसोटीत नापास झाला

पहिल्या कसोटीत भारताचा तीन दिवसांतच पराभव झाला, त्या सामन्यात शार्दुलची कामगिरी खराब होती. फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात २४ तर दुसऱ्या डावात केवळ दोन धावा केल्या. त्याचवेळी शार्दुलला पहिल्या डावात गोलंदाजीत यश मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेला दुसरा डाव खेळण्याची गरजच पडली नाही. आता शार्दुलला जर दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली तर टीम इंडियाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

भारतीय संघातील खेळाडूंनी दुसऱ्या कसोटीआधी केला सराव

सेंच्युरियनमधील ऐच्छिक सराव सत्रात केवळ सात ते आठ खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये शार्दुल व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा आणि के.एस. भरत यांचा समावेश होता. यावेळी सर्व प्रशिक्षक तेथे उपस्थित होते.

हेही वाचा: IND W vs AUS W: दीप्ती शर्माने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला क्रिकेटपटू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लेइंग११ मध्ये बदल होऊ शकतात

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये बदल होऊ शकतो. प्रसिध कृष्णाला संघ कायम ठेवणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. पहिल्या कसोटीत त्याने पदार्पण केले आणि त्याला फक्त एकच विकेट घेता आली. त्याने २० षटकात ४.७०च्या इकॉनॉमी रेटने ९३ धावा दिल्या. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीची चर्चा होत असून संघ व्यवस्थापनासमोर मुकेश कुमार आणि आवेश खान यांचा संघात समावेश होऊ शकतो. याशिवाय पाठीच्या दुखण्यामुळे पहिली कसोटी खेळू न शकलेला रवींद्र जडेजाही निवडीसाठी उपलब्ध होईल, असे मानले जात आहे.