Ishan Kishan Test Debut In WTC Final : ऑस्ट्रेलियाविरोधात पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात भारताच्या विकेटकीपरबद्दल मोठी चर्चा सुरु आहे. टीम इंडियाकडे के एस भरत आणि ईशान किशनच्या रुपारत दोन विकल्प आहेत. दोन्ही खेळाडूंना दांडगा अनुभव नाही. परंतु, किशनचं आतापर्यंत टेस्ट डेब्यू झालेला नाही. याबाबत दिनेश कार्तिकने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. WTC फायनलमध्ये ईशानचं टेस्ट डेब्यू करणं म्हणजे खेळाडूच्या आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. मला वाटतं भरत एक चांगला विकेटकीपर आहे. ईशानचं थेट या फायनलमध्ये डेब्य करणं तितकं उचित ठरणार नाही, असं कार्तिकनं म्हटलं आहे.

आयपीएलदरम्यान के एल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे किशनला या फायनलच्या स्क्वॉडमध्ये सामील केलंय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारताचे काही खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. तर आयपीएल २०२३ मध्ये व्यस्त असणारे खेळाडू त्यांच्या संघाचे सामने संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होणार आहेत.

नक्की वाचा – CSK विरोधात गुजरात टायटन्स फायनलमध्ये पोहोचल्यास इतिहास घडणार, IPL २०२३ मध्ये बनणार ‘हा’ ऐतिहासिक विक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीसी रिव्यूवर बोलताना कार्तिक म्हणाला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी के एस भरत विकेटकिपर म्हणून योग्य विकल्प ठरेल. ईशान किशनला या फायनलमध्ये डेब्यूच्या रुपात खेळवणं त्याच्या आवश्यकतेपेक्षा अधिक मागणी केल्यासारखं ठरेल. मला वाटतं की, भरत एक चांगला विकल्प ठरू शकतो. इशानच्या तुलनेत के एस भरत एक चांगला विकेटकिपर आहे. भरतची विकेटकिंपींग चांगली असल्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्यासोबत जाईल, असं मला वाटतं.