इंग्लंड दौऱ्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघ चांगलाच आनंदात आहे. काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने वयाच्या ३७ व्या वर्षात पदार्पण केलं. त्याचा वाढदिवस सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत साजरा केला. आतापर्यंत धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आपण पाहिले असतीलच. मात्र यादरम्यान केक कापत असताना धोनीसोबत पंगा घेणं भारताचा चायनामन कुलदीप यादवला चांगलचं महागात पडलं.
केक कापत असताना धोनीची पत्नी साक्षी व मुलगी झिवा या त्याच्या शेजारी उभ्या होत्या. केक कापल्यानंतर कुलदीप यादवने धोनीच्या चेहऱ्याला केक फासण्यास सुरुवात केली. यानंतर कॅप्टन कूल माहिने कुलदीपला असं काही उत्तर दिलं की सगळे जण हसत सुटले. बीसीसीायने या सेलिब्रेशनचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
#TeamIndia has reached Bristol and upon arrival it is time to celebrate#HappyBirthdayMSDhoni pic.twitter.com/298C0Ti9eQ
— BCCI (@BCCI) July 7, 2018
अंतिम सामन्यात धोनीने ५ झेल घेत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. फलंदाजीत धोनीला फारशी संधी मिळाली नसली तरीही त्याने यष्टीरक्षणात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. यानंतर गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत कोण बाजी मारतं आणि धोनी कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.