IND vs ENG 5th Test England Playing XI Announced : इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लिश संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनच्या जागी वेगवान गोलंदाज मार्क वुडचे पुनरागमन झाले आहे. चौथ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या जागी रॉबिन्सन खेळला होता. भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. शेवटची कसोटी जिंकून टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करायचे आहे. भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसीमध्ये अव्वल स्थानावर आहे.

इंग्लंड चार विशेषज्ञ गोलंदाजांसह मैदानात उतरणार –

इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज आहेत. रांची कसोटीत डावात पाच बळी घेणारा शोएब बशीर आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला. त्याचवेळी टॉम हार्टले त्याला फिरकीत साथ देईल. वुडशिवाय अँडरसन वेगवान गोलंदाजी करताना दिसणार आहे. या कसोटीत बेन स्टोक्स गोलंदाजी करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याने हळूहळू गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. धरमशाला येथील खेळपट्टी साधारणपणे वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. अशा स्थितीत स्टोक्सही गोलंदाजी करताना दिसू शकतो. त्याच वेळी, रूट अतिरिक्त गोलंदाजाची भूमिका बजावेल. रेहान अहमद लंडनला परतला असून तो मालिकेतून बाहेर पडला आहे.

RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ

अँडरसन सलग चौथी कसोटी खेळणार –

४१ वर्षीय जेम्स अँडरसन सलग चौथी कसोटी खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत इंग्लंडने तीन वेगवान गोलंदाजांना आजमावले असून अँडरसन त्यापैकी सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. त्याच्या नावावर आठ विकेट्स आहेत, तर वुडला फक्त चार विकेट घेता आल्या आहेत. हार्टले हा या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर २० विकेट आहेत. तर, बशीरने १२ विकेट्स घेतल्या आहेत. हार्टलीनंतर बुमराह, जडेजा आणि अश्विनचा क्रमांक लागतो. तिघांनीही १७-१७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Neil Wagner : “निवृत्तीसाठी कोणावरही दबाव टाकला गेला नाही…”, रॉस टेलरच्या विधानावर केन विल्यमसनचे प्रत्युत्तर

बेअरस्टोवर पुन्हा दाखवला विश्वास –

फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. संघ व्यवस्थापनाने फॉर्मात नसलेल्या जॉनी बेअरस्टोवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी झॅक क्रॉऊली आणि बेन डकेट यांच्यावर असेल. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स आणि बेअरस्टो यांच्यावर असेल. बेन फॉक्स यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळेल.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: झॅक क्रॉऊली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

नाणेफेकीच्या वेळी भारतीय संघ प्लेइंग इलेव्हन घोषित करेल –

गुरुवारी नाणेफेकीच्या वेळी भारतीय संघ आपला प्लेइंग इलेव्हन घोषित करेल. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत सिराज आणि आकाश दीप यांच्यामध्ये दुसरा वेगवान गोलंदाज कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचवेळी रजत पाटीदारच्या जागी देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळू शकते.