England Playing XI, India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये खेळवला जाणार आहे.दरम्यान मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या दोन दिवसाआधीच इंग्लंडने आपली प्लेइंग ११ जाहीर केली आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघात ख्रिस वोक्स कमबॅक करणार आहे. तर ब्रायडन कार्सला देखील पहिल्यांदाच मायदेशात खेळण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपासून नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळीची सुरूवात करणार आहे. मालिकेची सुरूवात हेडिंग्ले कसोटीपासून होणार आहे. भातरीय संघाने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केलेली नाही. मात्र, इंग्लंडने आपली पंरपरा कायम ठेवत,सामन्याआधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या प्लेइंग ११ मध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचं मिश्रण असल्याचं दिसून येत आहे. या संघात यष्टीरक्षक म्हणून जेमी स्मिथला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्थान देण्यात आलेलं नाही.
इंग्लंडमध्ये मालिका जिंकणं भारतीय संघासाठी मुळीच सोपं नसणार आहे. कारण भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली, त्यावेळी राहुल द्रविड भारतीय संघाचे कर्णधार होते. २००७ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडवर १-० ने विजय मिळवला होता. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील २ सामने ड्रॉ झाले होते. तर एका सामन्यात भारतीय संघाने बाजी मारून मालिका खिशात घातली होती.
या दौऱ्यानंतर भारतीय संघ ४ वेळेस इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. मात्र, भारतीय संघाला एकदाही मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी भारतीय संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे असणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे असणार आहे. शुबमन गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे त्याच्यावर दबाव असेल आणि मोठी जबाबदारी देखील असणार आहे.
भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ११
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>