scorecardresearch

Premium

WTC Points Table: टीम इंडियाने फक्त एक सामना जिंकत मारली बाजी! इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

WTC Championship 2023-25 : वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकलेल्या केवळ एका कसोटी सामन्याच्या आधारे भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. या विजयाच्या जोरावर टीम इंडियाने डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

WTC Points Table 2023-23 Updates
टीम इंडिया (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Team India gain in WTC Points Table 2023-25: असे म्हणतात की जेव्हा कोणाचे नुकसान होते, तेव्हा कोणाला तरी तरी फायदा होतो. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाच्या बाबतीत घडला आहे. खरं तर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपल्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला. यासोबतच दोन्ही संघांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकलेल्या अवघ्या एका कसोटी सामन्याच्या जोरावर भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे.

ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टीम इंडियाने पटकावले दुसरे स्थान –

टीम इंडिया १६ गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया २ सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा संघ २ सामने जिंकून पाचव्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचे १८ आणि इंग्लंडचे ९ गुण आहेत. भारतापेक्षा जास्त गुण असूनही स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाला -१० गुण आणि इंग्लंडला -१९ गुणांचा दंड आयसीसीकडून ठोठावण्यात आला आहे.

IND vs AUS: India's winning start in the World Cup defeating Australia by six wickets Rahul ended the match with a six
IND vs AUS, World Cup: विश्वचषकात भारताची विजयी सलामी! विराट-राहुलच्या दमदार खेळीपुढे ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे, सहा विकेट्सने शानदार विजय
World Cup 2023 Updates
World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘या’ दिग्गज खेळाडूचे खेळणे कठीण
Ashwin batting practice video Viral
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर रविचंद्रन आश्विनने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

पाकिस्तानने पटकावले अव्वल स्थान –

आता पॉइंट टेबलमधील टॉप ५ टीम्स पाहता पाकिस्तान १०० टक्के आणि एकूण २४ पॉइंट्ससह टॉपवर आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले. भारत ६६.६७ टक्के आणि एकूण १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पावसामुळे भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. ऑस्ट्रेलियाने विजयाच्या ३० टक्केवारीने आणि एकूण १८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाला २ सामन्यात विजय आणि २ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला हे नुकसान सहन करावे लागले.

हेही वाचा – ENG vs AUS: आयसीसीची इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर मोठी कारवाई! ‘ही’ चूक पडली महागात, डब्ल्यूटीसीमध्ये झाले नुकसान

वेस्ट इंडिज चौथ्या क्रमांकावर विराजमान –

वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे. ज्याचे १६.६७ टक्के गुण आणि एकूण ४ गुण आहेत. वेस्ट इंडिजला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड १५ टक्के गुणांसह एकूण ९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडने दोन सामने जिंकले आणि दोन गमावले. एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही सामने गमावल्यानंतर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी आतापर्यंत एकही कसोटी मालिका खेळलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: England australia lost due to slow over rate team india gain in wtc points table vbm

First published on: 02-08-2023 at 20:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×