टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज जेसन रॉय स्पर्धेबाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-१२ च्या अंतिम सामन्यात रॉयला दुखापत झाली होती. याआधी डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ईसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॉयऐवजी जेम्स विन्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. १० नोव्हेंबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंत पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. रॉयने टी-२० मध्ये ४ शतकांव्यतिरिक्त २५० षटकार ठोकले आहेत.
जेसन रॉयच्या पायाला दुखापत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० धावा केल्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात जेसन रॉयने चमकदार कामगिरी केली.. यामुळे संघाला विजेतेपद मिळवण्यात यश आले. २०१० मध्ये इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला होता. यावेळीही हा संघ मोठा दावेदार मानला जात आहे. न्यूझीलंड संघाला अद्याप टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
हेही वाचा – IPL 2022 : RCBला मिळू शकतो ‘मुंबईकर’ कप्तान..! टीम इंडियाच्या सलामीवीराचेही नाव चर्चेत
जेसन रॉयने २०१९ मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने ८ सामन्यात ६३ च्या सरासरीने ४४३ धावा केल्या. यात त्याने एक शतक आणि ४ अर्धशतके ठोकली होती. त्याच्या एकूण सांघिक कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर रॉयने २६२ सामन्यांत ६८४२ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि ४६ अर्धशतके केली आहेत. त्यात २५१ षटकारांचाही समावेश आहे.
जेम्स व्हिन्सचा टी-२० क्रिकेटमध्येही रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने २६७ सामन्यात ७१४६ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि ४४ अर्धशतके केली आहेत.