WTC Final Winner Australia Gets 13.2 Crores: ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा २०९ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. या सामन्यात पराभव होऊनही भारताला मोठी रक्कम मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाला जवळपास १३.२ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. यासोबतच डब्ल्यूटीसी स्पर्धेतील टॉप ९ संघांनाही चांगली रक्कम मिळाली आहे.

रविवारी लंडनमधील ओव्हल मैदानावर भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ नंतर भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धेतील अंतिम फेरीत झालेला हा चौथा पराभव ठरला.आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघासाठी $1.6 मिलियनची बक्षीस रक्कम ठेवली होती. त्यानुसार ऑस्ट्रेलियाला सुमारे १३.२ कोटी रुपये मिळाले. त्याचवेळी अंतिम फेरीत पराभवाचा सामना करणाऱ्या संघाला जवळपास ६.५ कोटी रुपये मिळाले. टीम इंडियाला ही बक्षीस रक्कम मिळाली.

याशिवय गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ३.७२ कोटी रुपये मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. इंग्लंड चौथ्या स्थानावर राहिला. त्याला २.८९ कोटी रुपये मिळाले. पाचव्या क्रमांकासाठी श्रीलंकेला १.६५ कोटी रुपये मिळाले.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: भारताच्या पराभवानंतर अनुष्का शर्मा झाली ट्रोल, विराट कोहली बाद झाल्यानंतरचा फोटो होतोय व्हायरल

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील बक्षीस रक्कम –

१.ऑस्ट्रेलिया – १३.२ कोटी रुपये
२. भारत – ६.५ कोटी रुपये
३. दक्षिण आफ्रिका – ३.७२ कोटी रुपये
४. इंग्लंड – २.८९ कोटी रुपये
५. श्रीलंका – १.६५ कोटी रुपये

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारताला २०९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाच्या पराभवाला त्याची फलंदाजी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली.