How Pakistan will reach semi final in World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची स्थिती सध्या चांगली दिसत नाहीये. बाबर अँड कंपनीसाठी स्पर्धेची सुरुवात चांगली झाली, मात्र गेल्या दोन सामन्यात संघाला सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे संघ ४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणे पाकिस्तानसाठी सोपे असणार नाही. चला तर मग उपांत्य फेरीचे समीकरणाबद्दल जाणून घेऊया, ज्यानंतर पाकिस्तान अजूनही टॉप-४ मध्ये पात्र ठरू शकतो.

उपांत्य फेरी गाठणे का कठीण?

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये २ सामने जिंकले असून आणि दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघाचा नेट रनरेट मायनस (०.४५६) मध्ये आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास संघासाठी सोपा असणार नाही.

पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?

जरी पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे अवघड असले, तरी ते अशक्य नाही. सध्या संघाकडे ५ सामने शिल्लक आहेत. जर संघाने सर्व ५ सामने जिंकले, तर शेवटच्या ४ मध्ये पोहोचणे सोपे होईल. होय, १४ गुणांसह हे शक्य आहे, परंतु बाबर आणि कंपनीने एकही सामना गमावला तर कमी गुण होतील. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे.

हेही वाचा – IND vs NZ, World Cup 2023: टीम इंडियाला दुहेरी धक्का! इशान आणि सूर्याही न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार नाहीत? जाणून घ्या कारण

तसेच, कोणताही सामना जिंकला तरी मोठ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून शेवटी नेट रन रेटचा प्रश्न उद्भवणार नाही. कारण २०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान खराब नेट रनरेटच्या कामगिरीमुळे उपांत्य फेरी गाठू शकला नव्हता. पाकिस्तानला उर्वरित ५ सामने अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहेत.