भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी त्यांच्याकडे ३३ वर्षांपासून असलेली महाराष्ट्र सरकारचा एक प्लॉट परत केला आहे. मुंबईतील वांद्रे या भागात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी ही जमीन गावस्कर यांना देण्यात आली होती. मात्र तब्बल ३३ वर्षांपासून ही जमीन ओस पडल्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर गावस्कर यांनी ही जमीन परत केली आहे.

हेही वाचा >>>> क्रिकेटपटू वृद्धिमान साहा धमकी प्रकरण, पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी

मिळालेल्या माहितीनुसार सुनिल गावस्कर यांनी क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी मुंबईमध्ये जागा देण्याची महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ३३ वर्षांपूर्वी गावस्कर यांना म्हाडातर्फे बांद्रा येथे एक प्लॉट दिला होता. मात्र अद्याप या जागेवर कोणतीही क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यात आली नाही. तीन दशकानंतरही वापर न झाल्यामुळे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत ओस पडलेला हा प्लॉट परत करण्याची गावस्कर यांना विनंती केली होती.

हेही वाचा >>>> अरे बापरे! मोहम्मद शमीच्या चेंडूवर लगावला ११७ मीटर लांबीचा षटकार, लियामची फलंदाजी पाहून सगळेच अवाक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि गावस्कर यांच्यात जवळपास आठ महिन्यांपासून चर्चा होत होती. शेवटी पूर्ण विचारविनिमय करुन गावस्कर यांनी हा प्लॉट म्हाडाला परत दिला आहे. त्याचबरोबर गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात क्रिकेट अकॅडमी स्थापन करु न शकल्याचा उल्लेख गावस्कर यांनी केला आहे, असं आव्हाड यांनी सांगितलंय.