टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत पोहोचले. रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी येणार असल्याचे बोलले जात होते, मात्र द्रविडने त्याला थांबवले आणि स्वतः मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आला. यादरम्यान राहुल द्रविडने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील सीनियर खेळाडूंच्या निवृत्तीबद्दल ते भारतीय खेळाडूंना परदेशी टी२० लीगमध्ये खेळणासाठी परवानगी यासर्व मुद्द्यांवर त्याने भाष्य केले.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर करोडो भारतीय चाहत्यांची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगलेच दुःखी दिसले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे पत्रकारांना सामोरे गेले. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. परदेशी लीग खेळण्याबाबत राहुल द्रविड म्हणाला की, “परदेशी लीगमध्ये खेळणारे भारतीय खेळाडू उपयुक्त ठरू शकतात, परंतु खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकतात की नाही हे बीसीसीआय ठरवेल. यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही पण ते खेळाडूंसाठी फायद्याचे ठरते हे इतर देशांतील खेळाडूंवरून दिसून येते.”

भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तर दिले. द्रविड म्हणाला, “वरिष्ठ खेळाडूंच्या भवितव्याबाबत सामन्यानंतर लगेचच बोलणे घाईचे आहे. यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. आम्ही पुढील विश्वचषकासाठी संघ तयार करण्याचा प्रयत्न करू.” या यादरम्यान राहुल द्रविडने इंग्लंडच्या सलामी जोडी जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सचेही कौतुक केले, द्रविड म्हणाला की “आम्हाला माहित आहे की हे दोघे त्यांचे प्रमुख खेळाडू आहेत, त्यांनी आमच्यावर दबाव आणला. आम्ही खेळावर नियंत्रण ठेवू असे आम्हाला वाटले होते, पण जेव्हा त्यांनी आमच्या फिरकीपटूंवर मारा सुरु केला तेव्हा आम्हाला ते जमले नाही. इंग्लंड चांगला खेळला आणि हेच वास्तव आहे.”

हेही वाचा :   T20 World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा झाला भावूक, पाहा video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड संघासोबत डगआऊटमध्ये पोहोचले तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसत होता. दोघे काही वेळ बोलले आणि त्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला, जिथे प्रशिक्षक राहुल द्रविड त्याला हाताळताना दिसला.