वृत्तसंस्था, म्युनिक

फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालिन सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक फ्रान्झ बेकेनबाउर यांचे सोमवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मारियो झगालो यांचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाले. दोन दिवसांत फुटबॉल विश्वातील दोन तारे निखळून पडले. ‘फिफा’च्या पुरस्कार समितीतही बेकेनबाउर यांनी काही काळ काम केले.

shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
novak djokovic
जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू

बेकेनबाउर हे जर्मन फुटबॉलचा चेहरा होते. पश्चिम जर्मनीसाठी बेकेनबाउर १०४ सामने खेळले. कारकीर्दीत १९७४ मध्ये विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे ते कर्णधार होते. त्यानंतर १६ वर्षांनी व्यवस्थापक म्हणून काम करताना १९९० मध्ये त्यांनी जर्मनीला दुसऱ्यांदा विश्वविजेते केले. तेव्हा जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव केला. बेकेनबाउर यांनी कारकीर्दीत ७०च्या दशकात बायर्न म्युनिककडून खेळताना युरोपियन अजिंक्यपदाची हॅटट्रिक नोंदवली. सर्वोच्च प्रतिभेचा बचावपटू म्हणून त्यांची ख्याती होती.

हेही वाचा >>>वरुण, ईशाला ऑलिम्पिक कोटा; पिस्तूल प्रकारात चमकदार कामगिरी

फुटबॉल विश्वात बेकेनबाउर ‘डेर कॅसर’ या टोपण नावाने लोकप्रिय होते. बेकेनबाउर यांचा मैदानावरील वावर जितका आक्रमक दिसायचा तेवढा तो मोहकही होता. पायात चेंडू आला की तो खेळवत खोलवर चाल रचण्याची बेकेनबाउर यांची हातोटी त्यांचे खेळातील श्रेष्ठत्व सिद्ध करणारी होती.

खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून बेकेनबाउर यांची कारकीर्द जेवढी झळाळून गेली तेवढीच त्यांची मैदानाबाहेरची कारकीर्द आयुष्याच्या उत्तरार्धात वादग्रस्त ठरली. अर्थात, या चुकींच्या आरोपांमुळे त्यांचे मैदानाबाहेरील आयुष्य विस्कळीत ठरले. जर्मनीमध्ये २००६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील संशयास्पद भ्रष्टाचारासंदर्भात २०१७ मध्ये वयाच्या ७१व्या वर्षी त्यांची चौकशी करण्यात आली होती. जर्मनीला स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बेकेनबाउर यांनीच २००० मध्ये प्राथमिक निविदा तयार केली होती. त्यानंतर ते या स्पर्धा संयोजन समितीचे एक भाग राहिले होते. बेकेनबाउर यांच्या कारकीर्दीतला हा काळ दुर्दैवी राहिला असला, तरी खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून त्यांची कारकीर्द कायमच गौरवशाली राहिली होती.

कामगार कुटुंबात जन्म

बेकेबाउर यांच्या जन्म सप्टेंबर १९४५ मध्ये म्युनिक येथील गिएसिंग या कामगारवर्गीय जिल्ह्यात झाला. वयाच्या १५व्या वर्षीच बेकेनबाउर बायर्न म्युनिक संघाच्या युवा संघात दाखल झाले. मध्यरक्षक म्हणून खेळणाऱ्या बेकेनबाउर यांनी १९६४ मध्ये क्लबसाठी लेफ्ट बॅक म्हणून पदार्पण केले. नंतर ते मध्यरक्षक म्हणून खेळू लागले. बेकेनबाउर यांच्याच नेतृत्वाखाली बायर्नने बुंडेसलिगाममध्ये पहिले विजेतेपद मिळवले.

हेही वाचा >>>IND vs AFG: आकाश चोप्राने केले मोठे विधान; म्हणाला, “टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार…”

बायर्नचे तारणहार

बायर्नपासून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या बेकेनबाउरने प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात १९९४ मध्ये पुन्हा एकदा बायर्नची धुरा सांभाळली. त्या वेळेस त्याने बायर्नला बुंडेसलिगा आणि दोन वर्षांनंतर ‘युएफा’ विजेतेपदापर्यंत नेले. प्रथम बायर्न म्युनिक क्लब आणि नंतर जर्मन फुटबॉल संघटनेचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

प्रेरणादायी खेळाडू

बायर्नसाठी बेकेनबाउर कायमच प्रेरणादायी ठरले. त्याच्या कारकीर्दीत १९७२ ते ७४ दरम्यान बायर्नने देशांतर्गत स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. त्यानंतर १९७४ ते १९७६ या कालावधीत तीन युरोपियन विजेतीपदेही बायर्नने मिळवली. वयाच्या २०व्या वर्षी स्वीडनमध्ये विश्वचषक पात्रता फेरीत त्यांनी पश्चिम जर्मनीसाठी पदार्पण केले. या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीने जर्मनीने इंग्लंडमध्ये १९६६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवला. यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला पण, तो जर्मनीचा फुटबॉल विश्वातील उदय होता.

झळाळती कारकीर्द

●पहिल्या विश्वविजेतेपदानंतर बेकेनबाउर यांची कारकीर्द झळाळतीच राहिली. दोन वेळा बेकेनबाउर बॅलन डी’ओर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.

●दोन दशके फुटबॉल विश्वात सम्राटासारखे राज्य केल्यानंतर १९८४ मध्ये अमेरिकन लीगमध्ये न्यूयॉर्क कॉसमॉसकडून ते अखेरचा सामना खेळले.

●निवृत्तीनंतर लगेच त्याच वर्षी पश्चिम जर्मनीने बेकेनबाउरची संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती केली.

●व्यवस्थापक म्हणून काम करताना दोन वर्षांत १९८६ मध्ये बेकेनबाउर यांनी जर्मनीला अंतिम फेरीत नेले. चार वर्षांनी १९९० मध्ये दुसऱ्यांदा विश्वविजेते केले.