गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही उल्लेख केला आहे. एका पाकिस्तानी चाहत्याने सुंदर पिचाई यांना त्यांच्या पोस्टद्वारे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु गुगलचे सीईओने असे काही उत्तर दिले की, त्याची बोलतीच बंद झाली. सुंदर पिचाई यांच्या या उत्तराला चांगलीच पसंती मिळत आहे आणि ट्विटर युजर्सही त्यांच्या सेवेज रिप्लायचा स्क्रीनशॉट घेऊन ते व्हायरल करत आहेत.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना सुंदर पिचाई यांनी ट्विट केले, ”दिवाळीच्या शुभेच्छा! आशा आहे की उत्सव साजरा करणार्‍या प्रत्येकजण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह चांगला वेळ घालवत असेल. शेवटची तीन षटके पाहून मी आज पुन्हा आनंद साजरा केला, काय खेळ आणि कामगिरी.”

सुंदर पिचाई यांनी येथे शेवटच्या तीन षटकांमध्ये भारताच्या धावांचा पाठलाग करण्याचा संदर्भ दिला. कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या क्लासिक खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

सुंदर पिचाई यांच्या या पोस्टवर पाकिस्तानच्या मुहम्मद शाहजेबने कमेंट करून ट्रोल करायचे होते. पाकिस्तानी चाहत्याने लिहले ‘पहिली तीन षटके पाहिली पाहिजेत’ असे लिहिले. मुहम्मद शाहजेबच्या या कमेंटला उत्तर देताना सुंदर पिचाई यांनी लिहिले, ‘ते पण केले, भुवी आणि अर्शदीपचा काय स्पेल होता.’

पाकिस्तानी फॅन पाकिस्तानची पहिली तीन षटके पाहण्याबद्दल बोलत होता, जिथे भारतीय फलंदाज पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांविरुद्ध झुंज देत होते. त्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांच्या विकेट्सही पडल्या होत्या. परंतु सुंदर पिचाईने चोख उत्तर दिले. भारतीय डावाची आठवण करून देताना अर्शदीप आणि भुवीच्या कामगिरीचा उल्लेख केला. ज्यामध्ये अर्शदीप आणि भुवीने चमकदार गोलंदाजी केली होती, त्या दरम्यान अर्शदीपने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला गोल्डन डकवर बाद केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – IND vs PAK : ‘त्याने अतिरिक्त डोकं लावलं’, शेवटच्या चेंडूआधी अश्विनसोबत काय चर्चा झाली होती? कोहलीने केला खुलासा, पाहा व्हिडिओ