Hardik Pandya Birthday Special: टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याचा आज वाढदिवस आहे. टी- २० विश्वचषकासाठी हार्दिक सध्या टीम इंडियासह ऑस्ट्रेलियात असल्याने पंड्या आपल्या कुटुंबापासून दूर बर्थडे साजरा करणार आहे. असं असलं तरी मिसेस पंड्या म्हणजेच नताशा स्टॅनकोव्हिक हिने आपल्या नवऱ्याच्या बर्थडेसाठी खास सरप्राईझ दिले आहे. हार्दिक अष्टपैलू आहे हे आपण सगळेच म्हणतो पण केवळ मैदानातच नव्हे तर घरातही तो विविध भूमिका पार पाडतो हे नताशाने शेअर केलेल्या व्हिडिओतून दिसून येते. कधी बाळासह खेळताना तर कधी कुत्र्यांसह खेळताना.. कधी मजामस्ती करणारा तर कधी रोमँटिक, हार्दिकची अशी भन्नाट रूपं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना कायम भूरळ घालते. हार्दिकने दुबईतील एक यॉटमध्ये नताशाला प्रपोज केले होते. यानंतर त्यांनी घरगुती कार्यक्रमातच लग्नगाठ बांधली आता दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. अनेकदा हार्दिकला प्रोत्साहन देण्यासाठी नताशा स्टेडियममध्ये दिसून येते. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक व्हिडीओ रील नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या क्रिकेट जगतातील एक गोड आणि हॅपनिंग कपल अशी यांची ओळख आहे.

आज हार्दिकच्या वाढदिवशी नताशाने व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शनमध्ये नवऱ्याचे कौतुक केले आहे. ” तू माझा स्टार आहेत, आम्हाला तुझा नेहमीच अभिमान वाटतो आणि आमचे सगळ्यांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं नताशाने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

नताशाचे हार्दिक पंड्याला खास सरप्राईज

Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तिथे ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या खेळाडूंनी केक कापून हार्दिकचा वाढदिवस जोरदार साजरा केला आहे. विराट कोहली व अन्य टीम सदस्यांसह सेलिब्रेशनचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीम इंडियाच्या या धडाकेबाज खेळाडूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!