पहिल्याच हंगामात संघाला जेतेपद मिळवून देणारा हार्दिक पंड्या येत्या आयपीएल हंगामातही गुजरात टायटन्सकडूनच खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गेले काही दिवस हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण ट्रान्सफर विंडोची मुदत संपल्यानंतर गुजरात टायटन्स संघाचं चित्र स्पष्ट झालं आहे. हार्दिक गुजरातचं नेतृत्व करेल. दरम्यान आयपीएल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेड विंडो १२ डिसेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आणखी बदल होऊ शकतात.

मुंबई इंडियन्स संघाने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला रिलीज केलं आहे. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर या दोघांना एकत्र खेळवून प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवण्याचा मुंबईचा विचार होता पण दोघांनाही दुखापतींनी सतवल्यामुळे हा विचार कागदावरच राहिला. आर्चर दुखापतीमुळे दोन वर्ल्डकप खेळू शकला नाही. अखेर मुंबईने आर्चरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्चरसह मुंबईने ट्रिस्टन स्टब्स, झाय रिचर्डसन, हृतीक शोकीन, ड्युआन यान्सन, रिले मेरडिथ, ख्रिस जॉर्डन यांनाही निरोप दिला आहे.

vande bharat loco pilot crying at retirement day celebration in bengaluru
VIDEO : अन् शेवटच्या दिवशी फुटला अश्रूंचा बांध, वंदे भारत ट्रेनच्या निवृत्त कर्मचाऱ्याला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत
Ambati Rayudu Hosts Mandatory Biryani Party for Chennai Super Kings Players in Hyderabad
IPL 2024: अंबाती रायुडूने CSK च्या खेळाडूंना दिली बिर्याणीची मेजवानी, पाहा VIDEO

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हर्षल पटेल, वानिंदू हासारंगा यांच्यासह जोश हेझलवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. फिन अॅलन, मायकेल ब्रेसवेल यांनाही रिलीज केलं आहे. पंजाब किंग्ज संघाने धडाकेबाज फलंदाज शाहरुख खानला रिलीज केलं आहे.

अन्य संघांपैकी कोलकाता नाईट रायडर्स संघाने गोलंदाजांची अख्खी फळीच रिलीज केली आहे. यामुळे लिलावात ते गोलंदाजी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असतील हे स्पष्ट झालं आहे. कोलकाताने शकीब उल हसन, शार्दूल ठाकूर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव यांना ताफ्यातून वजा केलं आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकला रिलीज केलं आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलचा येता हंगाम खेळणार का याविषयी साशंकता होती. पण चेन्नईने जारी केलेल्या यादीनुसार धोनी खेळणार असल्याचं पक्कं झालं आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने अनेक खेळाडूंना अलविदा केला आहे. यामध्ये सर्फराझ खान आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे. लखनौ संघाने जयदेव उनाडकत आणि डॅनियल सॅम्स या अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे.

आयपीएल २०२४ हंगामाकरता सर्व दहा संघासाठी ट्रान्सफर विंडोची मुदत संपली आहे. ट्रान्सफर विंडोअंतर्गत संघांना परस्पर सामंजस्याने खेळाडूंची अदलाबदल करता येते. नव्या हंगामापूर्वी संघांना काही खेळाडूंना रिलीज करता येतं.

चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलेले खेळाडू
महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शाईक रशीद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राजवर्धन हंगारगेकर, दीपक चहर, महेश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथीशा पथिराणा

रिलीज केलेले प्लेयर्स
बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरस, के. भगत वर्मा, शुभ्रांशू सेनापती, आकाश सिंग, कायले जेमिसन, सिसांदा मगाला

राजस्थान रॉयल्सने रिटेन केलेले खेळाडू
संजू सॅमसन, जोस बटलर, शिमोरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनाव्हन फरेरा, कुणाल राठोड, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप सेन,
नवदीप सैनी, प्रसिध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अॅडम झंपा, अवेश खान

रिलीज केलेले खेळाडू
जो रुट, ओबेड मेकॉय, जेसन होल्डर, अब्दुल बसिथ, आकाश वसिष्ठ, कुलदीप यादा, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, के.एम.आसिफ

दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेले खेळाडू
ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धूल, प्रवीण दुबे, विकी ओत्सवाल, अँनरिक नॉर्किया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.

रिलीज केलेले खेळाडू
रायले रुसो, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्ताफिझूर रहमान, कमलेश नागरकोट्टी, रिपल पटेल, सर्फराझ खान, अमन खान, प्रियम गर्ग.

कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन केलेले खेळाडू
श्रेयस अय्यर, नितीश राणा, रहमनुल्ला गुरबाझ, जेसन रॉय, सुनील नरिन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

रिलीज केलेले खेळाडू
शकीब अल हसन, लिट्टन दास, आर्या देसाई, डेव्हिड व्हिसे, नारायण जगदीशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, जॉन्सन चार्ल्स.

सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलेले खेळाडू
एडन मारक्रम, अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, हेनरिच क्लासन, मयांक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्रसिंग यादव, नितीश कुमार रेड्डी, शाहबाझ अहमद, अभिषेक शर्मा, मार्को यान्सन, वॉशिंग्टन सुंदर, सन्वीर सिंग, भुवनेश्वर कुमार, टी.नटराजन, मयांक मार्कंडेय, उम्रान मलिक, फझलक फरुकी

रिलीज केलेले खेळाडू
हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विव्रांत शर्मा, अकेल हुसैन, आदिल रशीद.

लखनौ सुपरजायंट्सने रिलीज केलेले खेळाडू
के.एल.राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, के.गौतम, कृणाल पंड्या, काईल मेयर्स, मार्कस स्टॉइनस, प्रेरक मंकड, युधवीर सिंग, मार्क वूड, मयांक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, नवीन उल हक.

रिलीज केलेले खेळाडू
डॅनियल सॅम्स, करुण नायर, जयदेव उनाडकत, मनन व्होरा, करण शर्मा, श्रेयंश शेडगे, स्वप्नील सिंग, अर्पित गुलेरिया

पंजाब किंग्सने रिटेन केलेले खेळाडू

शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, लियम लिविंगस्टन, गुरनूर सिंह, शिवम सिंह, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, विद्वत कवेरप्पा, कगिसो रबाडा, नॅथन एलिस

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने रिटेन केलेले खेळाडू

फाफ डुप्लेसी, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, रीस टॉपली, विल जॅक्स, रजत पाटीदार, अनुज रावत, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, मनोज भांडगे, आकाश दीप, राजन कुमार चौधरी, विशाक विजयकुमार, हिमांशु शर्मा, कर्ण शर्मा, मयंक डागर (हैदराबादकून ट्रेड केलेला खेळाडू)

गुजरात टायटन्सने रिटेन केलेले खेळाडू

हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, राशिद खान, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियम्सन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, जॉशुआ लिटिल, मोहित शर्मा.