Women’s T20 World Cup 2023 Semifinal: महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ५ धावांनी पराभव झाला. पराभवानंतर भारताची माजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक अंजुम चोप्राला मिठी मारताना कर्णधार हरमनप्रीत कौर रडली. अंजुम आणि हरमनच्या या भेटीचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

सामना गमावल्यानंतर हरमनप्रीत कौरने बराच वेळ स्वत:ला सावरले होते, पण अंजुम चोप्राने जाऊन तिला मिठी मारताच भारतीय कर्णधाराला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उपांत्य फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि या पराभवाबरोबरच भारताचे टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले.

अंजुम चोप्राला या भेटीबद्दल विचारले असता ती म्हणाली, “माझा आपल्या कर्णधाराला सहानुभूती देण्याचा हेतू होता, मी बाहेरूनही तेच देऊ शकते. तिच्यासाठी आणि माझ्यासाठीही हा भावनिक क्षण होता. अनेकवेळा भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे, तर अनेक वेळा पराभव झाला आहे. हे मी पहिल्यांदाच पाहिलं नाही, याआधीही पाहिलं आहे.”

अंजुम चोप्राला पुढे म्हणाली, “हरमनप्रीतने तिच्या दुखापती आणि तब्येतीचा सामना कसा केला हे मी पाहिले आहे, कदाचित आजचा दिवस असा असेल की ती खेळलीही नसती, पण ही वर्ल्ड कप सेमीफायनल आहे आणि हरमनप्रीत कौर एक पाऊल मागे घेणारी खेळाडू नाही. ती एक पाऊल पुढे टाकणारी खेळाडू आहे. आज तिने तेच केले.”

माजी भारतीय खेळाडू पुढे म्हणाली, “आज ती स्वत:ला त्या स्थितीत कशी आणू शकली, ज्यामध्ये आधी २० षटके क्षेत्ररक्षण केले आणि नंतर फलंदाजीत भारतीय संघाच्या आशा जागवल्या. भारतीय संघ ज्या प्रकारे हरला, ५ धावा खूप आहेत आणि खूप कमी पण आहेत. संपूर्ण सामना काय होता, मी समजू शकतो की यावेळी हरमनप्रीत कौरच्या हृदयात आणि मनात काय चालले असेल. प्लेअर टू प्लेयर हा एक क्षण होता आणि आम्ही दु:ख वाटून घेतले.”

हेही वाचा – INDW vs AUSW: Harmanpreet Kaur आणि MS Dhoni च्या खेळीत तब्बल ‘इतके’ योगायोग; चाहतेही झाले अवाक!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या संघाने २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर भारतासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ६ बाद १६७ धावाच करता आल्या. ज्यामुळे भारतीय संघाला ५ धावांनी पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.