बहुप्रतीक्षित महिला प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आज (१३ फेब्रुवारी) मुंबईत लिलाव सुरु झाला आहे. पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर बीसीसीआयने महिलांसाठी आयोजित केलेल्या विमेन्स प्रीमियर लीगसाठी (Women’s Premier League) लिलाव सुरू झाला आहे. महिलांच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ देखील सहभागी झाला आहे. आजच्या लिलावात मुंबईने त्यांची पहिली खेळाडू संघात सामील करून घेतली आहे. मुंबईने भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे. आगामी स्पर्धेत हरमनकडेच मुंबईच्या संघाचं नेतृत्व देखील दिलं जाऊ शकतं.

या लिलावात ४४८ महिला क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. त्यापैकी ९० खेळाडूंचं नशीब आज चमकणार आहे. हरमनप्रीतसह भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्यावर देखील मोठी बोली लागली. मंधाना ही महिला प्रीमियर लीगमधली सर्वात महाग खेळाडू ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने स्मृतीवर ३.४० कोटी रुपयांची बोली लावली. स्मृतीपाठोपाठ अ‍ॅश्ले गार्डनर ही दुसरी महागडी खेळाडू ठरली आहे. या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूवर गुजरात जायंट्सने तब्बल ३.२० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतलं.

rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष

हे ही वाचा >> WPL Auction 2023: स्मृती मंधानावर पहिल्याच फेरीत लागली सर्वाधिक बोली; आरसीबीने तब्बल ‘इतक्या’ कोटींना केले खरेदी

हरमनप्रीतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

भारताची कर्णधार हरमनप्रीतकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. मधल्या फळीतली आक्रमक फलंदाज असलेल्या हरमनने आतापर्यंत १२४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ शतकं आणि १७ अर्धशतकांच्या मदतीने ३,३२२ धावा फटकावल्या आहेत. तर टी-२० मध्ये ९ अर्धशतकं आणि एका शतकाच्या मदतीने २,९५६ धावा फटकावल्या आहेत.