चेन्नईच्या चेपॉक मैदानावरील तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने IPL चा अंतिम सामना हा हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ मे रोजी IPL चा अंतिम सामना रंगणार आहे. त्या आधी खेळवण्यात येणारे ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier 1 सामना हा चेन्नईला खेळवण्यात येईल, तर Eliminator and Qualifier 2 हे दोन सामने विशाखापट्टणम येथे खेळवले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

चेपॉकवरील आय, जे आणि के या तीन प्रेक्षागृहांच्या सुसज्जतेबाबत २०१२ पासून अद्यापपर्यंत स्थानिक महापालिकेकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादच्या मैदानाचाही पर्याय सज्ज ठेवण्यात आला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांनी आधीच सांगितले होते. इतक्या प्रदीर्घ काळापासून या प्रेक्षागृहांबाबत स्थिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे BCCI पदाधिकाऱ्यांनी अन्य पर्यायांची चाचपणी केली होती.

‘सध्या आमची तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनशी बोलणी सुरू आहेत. चेन्नईतच अंतिम सामना व्हावा, यात आमचा आक्षेप नाही. मात्र तीन रिकामे स्टँड ही आमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आयपीएलच्या प्ले-ऑफ, एलिमिनेटर आणि अंतिम फेरीसाठी आम्ही हैदराबाद आणि बेंगळूरु हे राखीव पर्याय ठेवले आहेत’, असे BCCI कडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अखेर हा निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

या स्पर्धेतील उर्वरित सामने –

२२ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
२३ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
२४ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
२५ एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
२६ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
२७ एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, जयपूर
२८ एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
२९ एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद
३० एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
१ मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
२ मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
३ मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
४ मे : दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू
५ मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स, मोहाली
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई