Yuzvendra Chahal Reveals About RCB: भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर. तो शेवटचा आयपीएल २०२३मध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना दिसला होता. राजस्थान रॉयल्स संघात सामील होण्यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी खेळत होता. आता फिरकीपटू युजवेंद्र चहलने आरसीबीबाबत खुलासा करताना या संघाच्या व्यवस्थापनावर एक आरोप केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तसा, चहल हा दिलखुरास स्वभावाचा माणूस असून तो रागावलेला तो क्वचितच दिसतो. युजवेंद्र चहलची विनोदी शैली चाहत्यांना अनेकदा मैदानावरही पाहायला मिळाली आहे. मात्र, अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याचा राग आरसीबी संघ व्यवस्थापनावर भडकला. आयपीएल २०२२ मध्ये चहलला आरसीबीने अचानक रिलीज केल्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 DC vs CSK Highlights : दिल्ली कॅपिटल्सने उघडले विजयाचे खाते, चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी रथाला लागला ब्रेक

रणबीर अल्लाबदिया शोमध्ये मुलाखतीदरम्यान चहलने आरसीबीबाबत एक खुलासा केला आहे. त्याने संघ व्यवस्थापनावर संवाद साधत नसल्याचा आरोप केला. युजवेंद्र चहल म्हणाला की, अर्थात, मला खूप वाईट वाटले. कारण माझा मुख्य प्रवास २०१४ मध्ये सुरू झाला. मलाही रिटेन न केल्याबद्दल विचित्र वाटले. कारण मी त्यांच्यासाठी आठ वर्षे खेळलो. आरसीबीमुळे मला इंडिया कॅप देखील मिळाली. कारण मी आलो तेव्हा त्यांनी मला कामगिरी करण्याची संधी दिली.”

चहल पुढे म्हणाला, “२०१४ मध्ये विराट भाईंनी माझ्यावर विश्वास दाखवला. पहिल्या सामन्यापासूनच मी खेळायला सुरुवात केली होती. मी अवाजवी रक्कम किंवा इतर गोष्टी मागितल्याचा लोकांचा कयास होता. त्यामुळे मी मागच्या मुलाखतीत स्पष्ट केले होते की, मी पैशाची कोणतीही मागणी केली नाही. मी किती पैशांचा हक्कदार आहे हे मला माहीत आहे.”

हेही वाचा – IND vs WI 1st Test: विजयानंतर रोहित शर्माला आला अनारकलीचा फोन, पत्नी रितिकाने केले ट्रोल

फिरकीपटू म्हणाला की, “मी आरसीबीसाठी जवळपास ११४ सामने खेळलो, पण त्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही. एकही फोन आला नाही. शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर मला खूप राग आला. मी आठ वर्षे त्यांच्यासाठी खेळलो आहे. चिन्नास्वामी हे माझे आवडते स्टेडियम आहे.”

हेही वाचा – Asian Games 2023: ‘आमचे स्वप्न देशासाठी…’; टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ऋतुराजची प्रतिक्रिया

चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १४५ सामन्यांमध्ये १८७ विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. सध्या चहल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. चहलने राजस्थान रॉयल्समध्ये त्याच्या पदार्पणाच्या मोसमात २७ बळी घेऊन तो आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज सिद्ध केले.