T20 World Cup Final PAK vs ENG Highlight: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी २० विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडने 5 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह इंग्लंड यंदाच्या टी २० विश्वचषक २०२२ चा चॅम्पियन ठरला आहे. इंग्लंडचा कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियात इंग्लंडने महत्त्वपूर्ण व शानदार विजय आपल्या नावे केला आहे. टी २० विश्वचषकाच्या इतिहासातील इंग्लंडचा हा दुसरा विजय आहे. संपूर्ण विश्वचषकात पाहायला मिळालेली ट्विस्ट अँड टर्नची मालिका आजच्या अंतिम सामन्यात दिसून आली.

इंग्लंड विरुद्ध अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फार चांगली सुरुवात केली नव्हती. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ दुबळा दिसत होता पाकिस्तानने इंग्लंडला ८ गडी बाद होऊन १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र पाकिस्तानचं गोलंदाजांनी बाजू सावरून धरत इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यापासून सुरुवातीपासूनच रोखून धरले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये शाहीन शाह आफ्रिदीने महत्त्वाच्या वेळी विकेट घेतली होत्या मात्र मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला गरज असताना ऐनवेळी शाहीन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि इंग्लंडला मोठी संधी मिळाली.

शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत

पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानने हॅरी ब्रूकला टाकलेला चेंडू झेलून शाहीन शाह आफ्रिदीने ब्रूकची विकेट घेतली. मात्र याच वेळी शाहीन आफ्रिदीला गुडघ्याला दुखापत झाली. यानंतर शाहीन शाह आफ्रिदी आपलं तिसरं षटक टाकण्यासाठी आला मात्र वेदनांमुळे त्याला गोलंदाजी करणे शक्य झाले नाही परिणामी एक चेंडू टाकून आफ्रिदीला सामन्यातून बाहेर पडावे लागले मोहम्मद इफ्तिकारने त्याचे षटक पूर्ण केले. ज्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार लगावला. हेच सामन्यातील निर्णायक षटक ठरलं आणि सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहीन आफ्रिदीने विकेट घेतली नसती तर…

शाहीन आफ्रिदीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आशिया चषकातही पाकिस्तानी संघाचा भाग होता आले नव्हते मात्र टी २० विश्वचषकाच्या आधी शाहीन आफ्रिदी फिट होऊन संघात परतला होता.