Pakistani Women Fan Viral Video: टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज बलाढ्य इंग्लंडला लढा देणार आहे. आजचा सामना भारताने जिंकावा अशी इच्छा जगभरातील क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. आश्चर्य म्हणजे स्वतः पाकिस्तानचे चाहते सुद्धा आज भारत जिंकावा आणि मग अंतिम फेरीत भारताविरुद्ध पाकिस्तान थरार अनुभवता यावा यासाठी प्रार्थना करत आहेत. अशाच एका पाकिस्तानी चाहतीचा व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. तुम्ही जर टी २० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीतील पाकिस्तान विरुद्ध न्यूझिलँड सामना पहिला असेल तर निश्चिचतच या तरुणीला ओळखलेच असेल.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड सामन्यांनंतर या पाकिस्तानच्या समर्थनासाठी आलेल्या तरुणीने मीडियाशी संवाद साधला यावेळी तिने उपांत्य फेरीत भारत सुद्धा जिंकावा अशी आशा व्यक्त केली. जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला तर त्यांना (भारताला) अशी लढत देऊ की त्यांना कायम लक्षात राहील असेही ही तरुणी म्हणाली. पाकिस्तानी गोलंदाज नसीम हा आपला आवडता खेळाडू असल्याचेही तिने सांगितले. या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर अनेक भारतीय तरुणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुम्हाला कडवी झुंज द्यायची तर द्याच असं म्हणत अनेकांनी या पाकिस्तानी सुंदरीला उत्तर दिले आहे, तुमच्या नसीमला आमचा विराट बघून घेईल असा इशाराही या व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आला आहे.

काय म्हणाली पाकिस्तानी सुंदरा?

IND vs ENG: ‘यांना’ टीममध्ये घ्यायची काय गरज..; सुनील गावस्कर भडकले, रोहित शर्माला सुनावले खडेबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टी २० विश्वचषकात उपांत्य फेरीत पाकिस्तानचा या संपूर्ण विश्वचषकातील सर्वोत्तम फॉर्म दिसला होता. गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही बाजूनी पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझीलँडची चिंता वाढवली होती. यंदा पाकिस्तान अंतिम फेरीत धडक देणारी पहिली टीम ठरली आहे. आज भारत विरुध्द्व इंग्लंड सामन्यातून यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा मान कोणाला मिळणार हे ठरणार आहे.