Virat Rohit surprised by Arshdeep’s batting video viral : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९वा सामना रविवारी भारत-पाकिस्तान संघात खेळला गेला. ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली आणि तीन विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. बुमराहच्या गोलंदाजीशिवाय पंतने फलंदाजीत ४२ धावा केल्या. पंतच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ ११९ धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ ११३ धावाच करू शकला. या सामन्यादरम्यान अर्शदीप सिंगने फलंदाजी करताना असे काही केले, जे पाहून विराट-रोहितही चकित झाले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वास्तविक, भारताच्या फलंदाजीदरम्यान अर्शदीप फलंदाजी करत असताना त्याने मोहम्मद आमिरविरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये अर्शदीप आमिरविरुद्ध बेधडक फलंदाजी करताना दिसत आहे, तो आमिरने चेंडू टाकण्यापूर्वी स्टंपपासून खूप दूर उभा राहिला होता. त्यानंत चेंडू टाकताच अर्शदीपने स्टंपजवळ जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जे पाहून डगआउटमध्ये बसलेले कोहली आणि रोहित आश्चर्यचकित झाले. आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भारतासाठी जसप्रीत बुमराह ठरला ‘गेमचेंजर’ –

पाकिस्तानविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह संघासाठी सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ ठरला. त्याने भारतीय संघासाठी ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट गेली. भारताच्या या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानी संघ २० षटकांत ७ बाद केवळ ११४ धावाच करू शकला.

हेही वाचा – “आम्ही शिखांनी तुमच्या माता-भगिनींना…”, भज्जीने खडसावल्यानंतर कामरानने वादग्रस्त वक्तव्यासाठी मागितली माफी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव –

टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.