Jasprit Bumrah Shares Video With Virat Kohli Voiceover: भारताकडून टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टने लक्ष वेधलं आहे. बुमराह अजूनही विजेतेपदाच्या आनंदातच असल्याचे या पोस्टवरून दिसून येत आहे. मायदेशी पोहोचल्यावर भारतीय संघाचे भव्य स्वागत करण्यात आले आणि बुमराहने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारताच्या या टी-२० विश्वचषक विजयात बुमराहने मोठी भूमिका बजावली आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने अनेक सामने आपल्या बाजूने फिरवले, ज्यात अंतिम सामन्याचाही समावेश आहे.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

बुमराहने आजच इन्स्टाग्रामवर मुंबईत झालेल्या विश्वविजेत्या संघाच्या विजयी परेडचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून तो स्वप्नात जगत आहे. दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. बुमराह नुकताच अहमदाबाद येथे त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.

बुमराहने शेअर केलेल्या व्हीडिओने लक्ष वेधून घेण्यामागचं कारण म्हणजे त्याच्या या व्हीडिओचा जो ऑडिओ आहे तो विराट कोहलीच्या आवाजातील आहे. गुरूवारी भारतीय संघाच्या विजयी परेडनंतर वानखेडे मैदानावर एक कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विराट कोहलीने बुमराहचे कौतुक केले होते. विराटची हीच वाक्य बुमराहच्या या व्हीडिओमागे सुरू आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बुमराहने म्हटले, “गेल्या काही दिवसांसाठी मी खूप आभारी आहे. मी एक स्वप्न जगत आहे आणि त्या स्वप्नाने मला आनंद आणि कृतज्ञतेने भरले आहे.”

हेही वाचा – रोहित-विराटने फायनलमध्ये बॅटिंग करण्यापूर्वीच दिले होते निवृत्तीचे संकेत, भावुक करणारा VIDEO व्हायरल

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात कोहली म्हणाला होता की, बुमराहसारखा खेळाडू अनेक पिढ्यांमधून एकदाच जन्माला येतो. यानंतर स्टेडियममध्ये बुमराहच्या नावाचा एकच जल्लोष सुरू झाला. पुढे कोहली म्हणाला, मला प्रत्येकाने या खेळाडूचे कौतुक करावे असे वाटते, ज्याने प्रत्येक सामना भारताच्या बाजूने वळवला. त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याच्यासारखा गोलंदाज अनेक पिढ्यांमधून एकदाच जन्माला येतो. तो भारतासाठी खेळतो याचा मला आनंद आहे.