Team India Stuck In Barbados: भारतीय संघाने २९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. विजयाच्या दुसऱ्याच दिवशी संघ भारताकडे रवाना होणार होता. पण काही कारणास्तव संघाला तिथेच थांबावे लागले. भारतीय संघ मायदेशी कधी दाखल होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. संघाप्रमाणेच भारतीय चाहतेही या दिवसाची वाट पाहत होते.

हेही वाचा – “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

टीम इंडियाला बार्बाडोसमधील खराब हवामानामुळे मायदेशी परतण्यात अडचण येत आहे. बेरिल वादळामुळे बार्बाडोसमधील हवामान खूपच खराब झाले आहे. हे वादळ लवकरच कॅरेबियन बेटावर धडकणार असल्याचे सांगण्यात येत असून स्थानिक सरकारने याला ‘अत्यंत धोकादायक’ श्रेणीत ठेवले आहे. त्यामुळे बीसीसीआयलाही संघाच्या मायदेशी परतण्याच्या योजनेत बदल करावा लागला असून अन्य पर्यायांचा विचार करत आहे.

कॅरेबियनमधील या चक्रीवादळाचा वेग १७० ते २०० किलोमीटर असण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत ब्रिजटाऊनचे विमानतळही ३० जून रोजी रात्री ८ नंतर बंद केले जाऊ शकते, अशी माहिती मिळाली होती. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांसह एकूण ७० जणांना तेथून परतावे लागणार आहे, ज्यासाठी BCCI आता अमेरिकेतून चार्टर विमानाची व्यवस्था करत आहे, जेणेकरून संघ तिथून निघू शकेल.

हेही वाचा – IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO

भारतीय संघ मायदेशी कधी परतणार?

बीसीसीआयचे सचिव जय शाह चॅम्पियन टीम इंडियाला चार्टर्ड फ्लाइटद्वारे भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. या विजयानंतर संघ बार्बाडोसमध्ये अडकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संघ इथून (ब्रिजटाऊन) न्यूयॉर्कला रवाना होणार होता आणि त्यानंतर दुबईमार्गे भारतात पोहोचणार होता. पण आता इथून थेट दिल्लीला चार्टर फ्लाइट घेण्याची योजना सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक घेण्याचाही विचार केला जात आहे.”, असे एका सूत्राने सांगितले. क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआय सुमारे ७० लोकांच्या भारतीय तुकडीसाठी एक चार्टर घेण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये क्रिकेटपटू, त्यांचे कुटुंबीय, सपोर्ट स्टाफ आणि इतर अधिकारी असतील. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे सर्व व्यवस्था पाहत आहेत. त्यामुळे भारतीय संघ लवकरच मायदेशी परतेल.