IND vs NED Highlight Suryakumar Yadav: टी-२० विश्वचषकात आज भारत नेदर्लंड्स विरुद्ध आपला दुसरा सामना खेळत आहे, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने नेदर्लंड्ससमोर १८० धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली नेदरलँड विरुद्ध सामन्यातही नाबाद राहिला यापूर्वी २३ ऑक्टोबरला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटने अत्यंत चमकदार कामगिरी करून भारतासाठी विजय खेचून आणला होता. यावेळेस नेदरलँड समोरही विराटने अर्धशतक पूर्ण केले. कोहलीला साथ देत भारतीय मिडल ऑर्डर फलंदाज सूर्यकुमार यादवनेही आज तुफान खेळी दाखवली.

सूर्यकुमारने २५ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. यात सात चौकार सुद्धा समाविष्ट आहेत. भारताच्या फलंदाजीच्या शेवटच्या चेंडूवर ४५ धावांवर खेळत असताना सूर्यकुमारने षटकार लावून अर्धशतकं पूर्ण केलं. २०० हून अधिकच्या रनरेटने सूर्यकुमारने नेदरलँड्सच्या विरुद्ध भारतीय संघाला मोठ्या धावांचे टार्गेट उभे करण्यास मदत केली. सामन्यानंतर सूर्यकुमारने आपल्या खेळाचे श्रेय विराट कोहलीला देत, कोहलीसह पार्टनरशिपवर भाष्य केले.

सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मला इथे बॅटिंग करायला मज्जा आली, मुळात विराटसह पार्टनरशिप नेहमीच ऊर्जा देऊन जाते. मी जेव्हा मैदानावर आलो तेव्हाच मला विराट म्हणाला की, तू या वर्षभरात जशी बॅटिंग केली आहेस तशीच कर, त्याचा सल्ला ऐकून आज खेळलो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्यकुमार यादव दमदार षटकार

तसेच सूर्यकुमारने आपल्या खेळीचे श्रेय पत्नीलाही दिले आहे, सूर्या म्हणाला की, ” माझी पत्नी पण आज सामना बघण्यासाठी आली आहे त्यामुळे सर्व बाजूंनी पाठिंबा मिळाल्याने आज खेळायला मजा आली. सूर्यकुमार यादवने इनिंगनंतर बोलताना विराट कोहलीवरही कौतुकाचा वर्षाव केला. विराट सध्या बेस्ट फॉर्म मध्ये आहे त्याला खेळताना पाहायला आणि त्याच्यासह खेळताना खेळाचा खरा आनंद अनुभवता येतो. याशिवाय सिडनीत भारतीय संघाला मिळालेला पाठिंबा पाहून यादवनेही आनंद व्यक्त केला.