आयसीसीने २०२१ वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महिला वनडे संघ (ICC Women’s ODI Team of the Year 2021) घोषित केला आहे. भारतीय कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांना या संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडची विश्वचषक विजेती कर्णधार हीदर नाइट हिला या संघाची कर्णधार बनवण्यात आले आहे. आयसीसीच्या या संघात दक्षिण आफ्रिकेचे ३ खेळाडू आहेत. तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी २ खेळाडू यात आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका क्रिकेटपटूला या संघात स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी आयसीसीने महिलांचा सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला. यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने स्थान मिळवले. परंतु पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही. टी-२० प्रकारात २०२१ या वर्षांत ३१.८७च्या सरासरीने एकूण २५५ धावा काढणारी स्मृती भारताचे उपकर्णधारपदही सांभाळते आहे.

हेही वाचा – ICC Men’s T20I Team Of The Year : पाकिस्तानच्या बाबर आझमकडं नेतृत्व; संघात एकही भारतीय नाही!

आयसीसी महिला सर्वोत्तम वनडे संघ – लिझेल ली, एलिसा हिली, टॅमी ब्युमाँट, मिताली राज, हीदर नाइट (कर्णधार), हेली मॅथ्यूज, मारिजाने कॅप, शबनिम इस्माईल, फातिमा सना, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद.

आयसीसी महिला सर्वोत्तम टी-२० संघ – स्मृती मानधना, टॅमी ब्युमाँट, डॅनी वॅट, गॅबी लेविस, नॅट शिव्हर (कर्णधार), एमी जोन्स, लॉरा वोलव्हर्ट, मारिजाने कॅप, सोफी एक्लेस्टोन, लॉरिन फिरी, शबनिम इस्माईल.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc womens odi team of the year 2021 adn
First published on: 20-01-2022 at 14:38 IST