Sunil Gavaskar on Suryakumar Yadav : आयपीएल २०२४ च्या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत. हंगामाची सुरुवात गुजरात टायटन्सच्या पराभवाने झाली. यानंतर, सनरायझर्स हैदराबादने मुंबईचा पराभव केला. यानंतर घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांना पहिल्या विजयाची अपेक्षा होती, पण राजस्थानने विजय मिळवत त्यांचा अपेक्षा भंग केला. या पराभवानंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे की मुंबईला गेम चेंजर सूर्यकुमार यादवची उणीव भासत आहे.

मुंबईला गेम चेंजर सूर्यकुमारची उणीव भासते –

मुंबई इंडियन्सच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलताना गावसक म्हणाले, “मुंबई इंडियन्सला नक्कीच सूर्यकुमार यादवची उणीव भासत आहे. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि तो खूप चांगल्या प्रकारे पलटवार करु शकतो, परंतु तो यावेळी उपलब्ध नाही. मुंबई इंडियन्सची टीम अपेक्षा आणि प्रार्थना करत असेल की तो लवकर बरा होऊन खेळण्यासाठी उपलब्ध व्हावा. कारण तो सामन्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. तो एक गेम चेंजर आहे.”

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?

मुंबईची इंडियन्सच्या फलंदाजांनी केले निराश –

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी निराश केले. कारण या सामन्यात हार्दिक आणि तिलर वगळता प्रत्येकाने खराब फलंदाजी केली. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज खाते उघडण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांना ट्रेंट बोल्डने गोल्डन डक केले. तिलक वर्मा (३२) आणि हार्दिकच्या (३४) धावांच्या मदतीने मुंबईला १२५ धावसंख्या उभारता आली. ज्याचा राजस्थानच्या फलंदाजांनी सहजपणे पाठलाग केला.

हेही वाचा – MI vs RR : राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान, मुंबईला ६ विकेट्सनी नमवले

रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद –

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. आतापर्यंत, रोहित शर्माशिवाय, दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात १७ वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेल विक्रमी १५ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.