India vs South Africa 1st Test Match: भारतीय संघ ३६ दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाची निराशा विसरण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यासाठी ३१ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने ‘दिग्गज’ रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल आणि या दौऱ्याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा शेवटचा कसोटी दौरा असू शकतो.” तो पुढे म्हणाला, “या जोडीकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत.”

अ‍ॅलन डोनाल्ड म्हणाला, “ते इथे येऊन दक्षिण आफ्रिकेत खेळायला खूप उत्सुक असतील. विराटची एकाग्रता कशी कार्य करते हे मला माहीत आहे, त्याच्याबरोबर आरसीबीमध्ये मी खूप वेळ घालवला आहे. तो आपले सर्वोत्कृष्ट खेळी येथे खेळायला आला आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जर त्याचा दक्षिण आफ्रिकेचा हा शेवटचा दौरा असेल तर असे वाटते की तो येथे येऊन खूप धावा करेल. त्याचा हा शेवटचा दौरा असेल याबद्दल मला आणि इतर कोणालाही अजून अधिकृत माहीत नाहीये असो. विराट हा फिटनेससाठी ओळखला जाणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे इतर खेळाडू प्रेरित होतात. जर या दोघांचा हा शेवटचा दौरा असेल तर ते खरोखरच ते इथे खूप मोठा धमाका करतील.”

Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

हेही वाचा: IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, ‘या’ दोन खेळाडूंचे पुनरागमन

डोनाल्ड पुढे म्हणाला, “हे दोन फलंदाज आफ्रिकेसाठी धोकादायक ठरतील यात शंका नाही. मला वाटतं ही कसोटी मालिका बघायला मजा येईल. ते लोक या खेळाचे परिपूर्ण खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडूंमध्ये या दोघांची गणना करता येईल. दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याच्या इराद्याने ते इथे आले आहेत, असे एकूण त्यांच्या सरावातून दिसते. त्यांची मानसिकता ही विजय मिळवून देण्याची असल्याने, ते कसे काम करतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.”

सेंच्युरियन येथे होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ सरावात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच रेहित शर्मा अँड कंपनीने क्षेत्ररक्षणाचाही सराव केला आहे. बीसीसीआयने याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरला म्हणजेच बॉक्सिंग डे ला सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवला जाईल. मात्र, याच्या एक दिवस आधी पावसाने भारतीय संघाच्या सराव सत्रात व्यत्यय आणला आणि सत्र रद्द करावे लागले. पण भारतीय संघ बराच काळ मेहनत करत आहे. दोन दिवसांपूर्वीही संघातील सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंनी केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही घाम गाळला आहे.

हेही वाचा: IND vs SA 1st Test: बॉक्सिंग-डे कसोटी आधी सेंच्युरियनमध्ये मुसळधार पाऊस, भारताची तिन्ही सराव सत्रे रद्द; पाहा Video

क्षेत्ररक्षणाच्या सराव सत्रादरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड युवा यशस्वी जैस्वालला झेलचा सराव देताना दिसला. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल यांच्यासह इतर खेळाडूंना सराव करायला लावला. व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू अप्रतिम लयीत दिसत आहेत. मोहम्मद सिराज आणि गिल यांनी मैदानावर जबरदस्त क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवले आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधी मुसळधार पावसाने भारतीय संघाच्या शेवटच्या सराव सत्रात व्यत्यय आणला. त्यानंतर सत्रे रद्द करण्यात आली आहेत. याआधी संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव केला होता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, के.एस. भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर. मार्को जॉन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक).