scorecardresearch

IND vs AUS 3rd Test: इंदोर कसोटी सामन्यावरुन BCCI ट्रोल; चाहत्यांनी चौथ्या आणि पाचव्या दिवसासाठी केली अजब विनंती

Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदोर येथे खेळली जात आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळानंतर बीसीसीआय ट्रोल होत आहे.

IND vs AUS 3rd Test Fans trolled BCCI
बीसीसीआय (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी सुमारे दीड डाव खेळला गेला आहे. भारतीय संघ पहिल्या डावात १०९ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५६ धावा केल्या होत्या. म्हणजेच पहिल्या दिवशी एकूण १४ विकेट पडल्या. या सर्व विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. अशा परिस्थितीत बीसीसीआय या खेळपट्टीबाबत पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आले आहे. युजर्सनी बीसीसीआयला जोरदार ट्रोल केले.

बीसीसीआयला युजर्सनी ट्रोल केले –

एका यूजरने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती मॅच बघताना दिसत आहे. त्याच्या हातात एक पोस्टर आहे, ज्यावर ‘बीसीसीआय चौथ्या आणि पाचव्या दिवशी तिकिटांची विक्री थांबवा’ असे लिहिले आहे. यूजरने पोस्टमध्ये लिहिले, इंदोर कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ पाहिल्यानंतर बीसीसीआयला विनंती.

या युजरला उत्तर देताना दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘खर सांगू, मला वाटत नाही की चौथ्या किंवा पाचव्या दिवशी कोणीही फॅन तिकीट खरेदी करेल.’ तर दुसऱ्या युजरने खेळपट्टीवर निशाणा साधला आणि कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीचे वर्णन केले. त्याने लिहिले की, ‘ही खेळपट्टी रोहित शर्माच्या करिअरपेक्षा वाईट आहे.’

सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव ७६.३ षटकांत १९७ धावांवर आटोपला. ज्यामध्ये भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर उमेश यादव आणि आश्विनने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ६० धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी केवळ ११ धावांत ६ विकेट्स घेत कांगारूंना सळो की पळो करून सोडले.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: Ravichandran Ashwin ने मोडला Kapil Dev चा विक्रम; भारतासाठी ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

त्यानंतर आता भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. भारताने दुसऱ्या डावात २२ षटकानंतर २ बाद ५० धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा १२ आणि शुबमन गिलला ५ धावा करुन बाद झाले. सध्या चेतेश्वर पुजारा २० आणि विराट कोहली ९ धावांवर खेळत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायनने दोन विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:00 IST
ताज्या बातम्या