भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघही या आव्हानाचा जोमाने पाठलाग करत आहे. मात्र, यादरम्यान भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठवे शतक ठोकले आहे. मात्र शतकाआधी कोहली के. एस. भरतवर का भडकला ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

केएस भरतच्या ‘या’ कृतीचा विराटला राग आला

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान विराट कोहली के. एस. भरतसोबत धुमसत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, या घटनेदरम्यान विराटने भरतला धाव घेण्यासाठी बोलावले तेव्हा भरतने तसे करण्यास नकार दिला. दरम्यान, विराटसाठी काही अडचणी वाढल्या आणि त्याने बाहेर पडणे जवळपास टाळले. यजमानांच्या डावाच्या १०९व्या षटकात ही घटना घडली. विराटला चेंडूवर चालत धाव गोळा करायची होती. त्याने नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या भरतला बोलावून धाव घेण्यास सांगितले. यादरम्यान एकीकडे विराट धावत अर्ध्या खेळपट्टीपर्यंत पोहोचला, तर दुसरीकडे के. एस. भरतने काही पावले पुढे टाकत विराटला माघारी पाठवले. सहकारी खेळाडूच्या या कृतीचा विराटला राग आला. खेळपट्टीवर पोहोचून त्याने नाराजीने भरतकडे पाहिले, विराटची प्रतिक्रिया त्याची नाराजी दर्शवत होती.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका

के. एस. भरतची ही कृती पाहून विराट कोहलीला राग आला आणि तो मागे फिरत रागात म्हणाला, “अरे काय करतोस भावा” असं म्हणत चिडला आणि अपशब्द बोलला. यानंतर के. एस. भरत याने मान झुकवून त्यांची माफी मागितली. याआधीही विराट कोहलीने अनेक खेळाडूंवर धावा काढल्याबद्दल चिडचिड केली आहे. मात्र, सामना लंच ब्रेकमध्ये त्याने त्यालाही पटवून दिले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४१ चेंडूंचा सामना करताना १०० धावा करत शतक ठोकले. या धावा करताना त्याने ५ चौकारही मारले. विशेष म्हणजे, हे विराटचे कसोटीतील २८वे शतक ठरले. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे हे ७५वे शतक होते. तसेच, दाखवून दिले आहे की, फक्त वनडे आणि टी२०मध्येच नाही, तर विराटची बॅट कसोटीतही चांगलीच चालते.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: विराट कोहलीला गवसला सूर! अहमदाबाद कसोटीत शतक झळकावत टीकाकारांची तोंडं केली बंद

किंग कोहलीची कसोटी कारकीर्द

विराट कोहली याने या कसोटीपूर्वी भारताकडून १०७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४८.१२च्या सरासरीने ८२३० धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २७ शतके आणि २८ अर्धशतके चोपली होती. आता यामध्ये आणखी एक शतकाचा समावेश झाल्यामुळे कसोटीत त्याच्या नावावर २८ शतके नोंदवली गेली.