अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. रविवारी (१२ मार्च) विराट कोहली याने स्वतःचे ७५वे आंतरराष्ट्रीय शतक केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना विराट कोहली आणि अक्षर पटेल खेळपट्टीवर कायम होते. चौथ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम काढला. विराटने आपल्या शतकाचे रुपांतर पुढे दीडशतकात केले. सोबतच संघाची धावसंख्या ५५० पार पोहोचवली. मात्र अक्षरचे शतक हुकले पण त्याने महेद्रसिंग धोनीचा अनोखा विक्रम मोडला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना अक्षर पटेलने अर्धशतक झळकावले. ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षरचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक आहे. त्याने ११३ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. अक्षरने नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ८४ तर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत ७४ धावा केल्या.

अक्षर पटेलने तोडला एम.एस.धोनीचा विक्रम

बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत एका मालिकेत सर्वाधिक ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत अक्षर सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करत संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी, एम.एस. धोनीने २००८च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ७व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना तीन पन्नास अधिक धावा केल्या होत्या.

अक्षरने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्याच्या मालिकेत अक्षरने २५४ हून अधिक धावा केल्या आहेत. अक्षरने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३९ धावा करणाऱ्या एमएस धोनीचा विक्रम मोडला. या यादीत ऋषभ पंत ३५० धावांसह पहिल्या स्थानावर आहे, त्याने २०१८च्या कसोटी मालिकेत या धावा केल्या होत्या.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: स्वस्तात विकेट फेकणाऱ्या जडेजाला पाहून विराटचा चढला पारा! समालोचकांनीही घेतले तोंडसुख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या होत्या

भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने ९१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १८६ धावा केल्या. त्याचवेळी शुबमन गिलने १२८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही ७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही आणि भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.