scorecardresearch

IND vs AUS 3rd Test: हिटमॅनची डिमांड अन् पुजाराचा खणखणीत षटकार, ड्रेसिंग रूममधून अशा रिअ‍ॅक्शन आल्या की…; Video व्हायरल

India vs Australia: रोहित शर्माने १२वी खेळाडू ईशान किशनला संदेश पाठवला की मोठे शॉट्स मारावे लागतील. मग काय, चेतेश्वर पुजाराने उत्साहात येऊन असा षटकार मारला की चेंडू स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर पडला.

Ind vs Aus: On Rohit's demand Pujara hit a six then the captain gave a wonderful reaction from the dressing room video went viral
सौजन्य- हॉटस्टार (ट्विटर)

India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या कोळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसरा सामना देखील तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. पण यावेळी भारतीय संघ पराभूत झाला असून ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. पराभवानंतर भारतीय संघ या कसोटी मालिकेत सध्या २-१ अशा आघाडीवर आहे. या कसोटीत रोहित शर्माचा अंदाज आणि ड्रेसिंग रूममधील रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.

खेळाच्या दुसऱ्या दिवशीच भारताला दुसऱ्या डावाची सुरुवात करावी लागली. ज्यामध्ये त्याला ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या १७५ धावांच्या आघाडीवर मात करावी लागली. मात्र, केवळ चेतेश्वर पुजाराने १४२ चेंडूत ५९ धावा करत अव्वल फळीकडून दीर्घ खेळी खेळू शकला. ज्यामध्ये ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. जरी त्याचा हा एक षटकार चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला आहे. कारण त्यामागची कथा खूप रंजक होती.

रोहित शर्माने दिला होता खास संदेश

पुजाराने सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आणि नॅथन लियॉनला लक्ष करत त्याच्यावर हल्ला चढवला, जो भारतीय फलंदाजांसाठी काळ ठरला. खरं तर, ५२व्या षटकात, कर्णधार रोहित शर्मा नाखूष दिसत होता कारण पुजारा आणि अक्षर पटेल दोघेही खूप हळूहळू खेळत होते खराब चेंडूंना देखील मारत नसल्याचे दिसत होते. दोघेही खेळपट्टीवर विकेट वाचवण्याचा विचार करत असताना कर्णधार रोहितच्या मनात धावा वाढवण्याचा विचार आला. अशा स्थितीत त्याने १२वा खेळाडू इशान किशनला ड्रिंक्ससह मैदानात पाठवले आणि दोन्ही खेळाडूंना मोठे फटके मारण्याचा सल्ला दिला.

मग काय कर्णधाराचा आदेश शिरसावंद्य मानत त्याने शानदार षटकार मारला. काही षटकांनंतर चेतेश्वर पुजाराने पुढे जाऊन नॅथन लायनला जबरदस्त षटकार ठोकला. त्याने फुटवर्कचा वापर करत पुजाराने चेंडू स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर मारला. हा षटकार पाहून ड्रेसिंग रूममध्ये बसलेला कर्णधार रोहित शर्माचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, त्याची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. जिथे तो चेहऱ्यावर मोठे स्मित घेऊन टाळ्या वाजवताना दिसत होता. पण रोहितचा आनंद फार काळ टिकला नाही कारण काही षटकांनंतर स्टीव्ह स्मिथने नॅथन लायनच्याच चेंडूवर जबरदस्त झेल देऊन चेतेश्वरचा डाव संपवला.

सामन्यात काय झाले?

उभय संघांतील या इंदोर कसोटीत भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले, परिणामी संघाला पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील या सामन्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर परिणाम होईल. अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे स्थान आता जवळपास पक्के झाले आहे. दुसरीकडे भारतीय संघाला मात्र अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अजूनही कसरत काही सामने खेळावे लागतील. होळकर स्टेडियमवर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियान सलामीवीर उस्मान ख्वाजा याची एकमेव विकेट भारताला मिळाली. फिरकीपटू रविचंद्नन अश्विन (०) याने ख्वाजाला शुन्यावर तंबूत पाठवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 11:38 IST