scorecardresearch

Premium

IND vs AUS: “मला गोलंदाजी…”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा खुलासा

IND vs AUS, 5th T20: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने खुलासा केला की तो भारतासाठी गोलंदाजीसाठी उत्सुक आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.

IND vs AUS: I wanted to bowl in yesterday's match Shreyas Iyer made a big revelation after the series win against Australia
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने खुलासा केला की तो भारतासाठी गोलंदाजीसाठी उत्सुक आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia 5th T20: भारताने ऑस्ट्रेलियावर ४-१ने मालिका जिंकल्यानंतर, टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने खुलासा केला की, “मी भारतासाठी गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे.” गोलंदाजी न करण्याचे कारणही त्याने सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला या खेळाडूच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यामुळे त्याला दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरस्त असून त्याला गोलंदाजी करायला आवडेल.

२८ वर्षीय अय्यरने सांगितले की, “दुखापतींमुळे एनसीएमधील प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली नाही.” श्रेयस अय्यर सामन्यानंतर जिओ सिनेमाशी बोलताना म्हणाला, “मी गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक होतो, परंतु फिजिओ आणि एनसीए प्रशिक्षकाचे म्हणणे योग्य आहे की, तुम्ही आता काही काळ गोलंदाजी करू शकणार नाही.”

AUS vs NZ 2nd T20I Highlights in marathi
AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला
Former England captain Michael Atherton Statement
IND vs ENG : जसप्रीत बुमराहसमोर बेन स्टोक्स वारंवार का अपयशी ठरतोय? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण
Shubman Gill's reaction to century against ENG 2nd Test
IND vs ENG : “माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, तेव्हा…”, इंग्लंडविरुद्धच्या शतकी खेळीनंतर शुबमन गिलची प्रतिक्रिया

हेही वाचा: Ashish Nehra: रिंकू सिंग टी-२० विश्वचषकसंघाचा भाग असेल का? आशिष नेहरा म्हणाला, “अजून तो…”

श्रेयसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ७.३ षटके टाकली असून त्यात ४३ धावा दिल्या आहेत. मात्र, या युवा खेळाडूला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही. श्रेयसने प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-२० क्रिकेटमध्ये १० विकेट्स घेतल्या आहेत. जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा संबंध आहे, श्रेयस रविवारी, ३ डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात प्रभावी ठरला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३७ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने आठ गडी गमावून १६० धावा केल्या. तीन सामन्यांत श्रेयसने २१.६७ च्या सरासरीने ६५ धावा केल्या. श्रेयसने अ‍ॅरोन हार्डी आणि मॅथ्यू वेडला बाद करण्यासाठी शानदार झेल घेतले. श्रेयस अय्यरसमोर आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे, कारण तेथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर गोलंदाज त्याला शॉर्ट बॉल टाकून त्रास देऊ शकतात.

हेही वाचा: इटली, स्पेन, क्रोएशिया एकाच गटात; पुढील वर्षीच्या युरो फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर

मुकेशची अफलातून गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत आठ विकेट्स गमावत १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १५४ धावा करता आल्या. त्यासाठी बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या, मात्र, तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅविस हेडने २८ आणि मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. टीम डेव्हिड १७ धावा करून बाद झाला तर मॅथ्यू शॉर्ट १६ धावा करून बाद झाला. अॅरॉन हार्डीला केवळ ६ धावा तर जोश फिलिपला केवळ ४ धावा करता आल्या. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus i wanted to bowl yesterday match shreyas iyer revealed after the series win against australia avw

First published on: 04-12-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×