भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (२२ मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने २१ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका २-१ अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित सर्व पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले. त्यावर आता क्रिकेट समुदायातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया भारताचा माजी यष्टीरक्षक अजय जडेजाने केली आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने भारतीय संघ व्यवस्थापनावर, विशेषत: कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची क्रमवारी चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल टीका केली. सूर्या तिसऱ्या वनडेत चौथ्या क्रमांकाऐवजी सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला आणि पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तो भोपळाही न फोडता बाद झाला.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

हेही वाचा: WPL 2023: RCBमध्ये दोन-दोन विराट; स्मृती मंधानाने कोहलीच्या गोलंदाजीची केली हुबेहूब नक्कल, Video व्हायरल

अजय जडेजा क्रिकबझवर बोलताना म्हणाला, “की सूर्याला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे होते.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही चांगल्या काळातून जात असाल, तेव्हा तुम्ही फलंदाजाला थांबायला लावल्यास काही फरक पडत नाही, पण जर फॉर्म चांगला नसेल आणि तुम्ही खेळाडूला त्याच्या फलंदाजीची वाट पाहायला लावली तर त्याचे मन वेगवेगळ्या दिशेने भरकटते, शेवटी तोही माणूसच आहे.” जडेजा पुढे म्हणाला, “तोच सूर्यकुमार यादव आहे ज्याने संपूर्ण मैदानावर ३६० अंश धावा केल्या आहेत. जेव्हा विराट कोहलीसारखा कोणीतरी इतके महिने फॉर्ममध्ये नसतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की मनात काहीतरी आहे, ज्यामुळे तुमच्या खेळावर त्याचा वाईट परिणाम होतो.” त्याने म्हटले आहे की, “जेव्हा तो एकदिवसीय मध्ये पदार्पण करून आला तेव्हा तो मिडल ऑर्डरमध्ये खेळला होता. त्याला तिथेच अधिक सोयीस्कर वाटले होते.”

माजी यष्टीरक्षक पुढे म्हणाला, “आमच्या काळात असे म्हटले जायचे की जर कोणी फॉर्ममध्ये नसेल आणि तो जर चौथ्या क्रमांकावर खेळला तर तुम्ही त्याला सातव्या क्रमांकावर पाठवले ही बाब त्या खेळाडूसाठी नेहमीच अधिक आव्हानात्मक असते. जेव्हा तुम्हाला वारंवार संधी एकाच क्रमांकावर दिली जाते तेव्हा अधिक आरामदायक त्या फलंदाजाला वाटत असते. तुम्ही ७व्या क्रमांकावर येता, त्यावेळेस तुमच्या फलंदाजीत जी काही शक्ती आहे, ती तुम्ही आधीच गमावलेली असते, त्यातील ६०-८० टक्के षटके आधीच संपलेली असतात. त्यात अशा अटीतटीच्या रोमांचक सामन्यात अधिक दबाव येतो आणि खराब फटका मारून तुम्ही बाद होतात. जेव्हा तुम्ही वरच्या क्रमांकावर खेळता तेव्हा तुम्हाला फॉर्म परत मिळवण्याची संधी असते. रोहित शर्मा आणि द्रविड या दोघांना मला सांगायचे आहे की तुम्ही कोणालाही वाचवू शकत नाही. जर तुम्ही एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर हा गेम तुम्हाला मारून टाकेल.”

हेही वाचा: IND vs AUS: live सामन्यादरम्यान विराटने स्टॉयनिसला जाणूनबुजून धक्का दिला? Video पाहा अन् तुम्हीच ठरवा

रोहित शर्माने सांगितले पराभवाचे कारण

“संघातील प्रमुख खेळाडूंच्या दुखापती ही समस्या आहे. भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असते. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याच कारणाने दुखापती होतात. मी याबाबतीतील तज्ञ नाही. मात्र, विश्वचषकासाठी आमचे सर्वोत्तम पंधरा खेळाडू ‌ उपलब्ध असतील अशी मला आशा आहे.” भारतीय संघाचे संघ व्यवस्थापन खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करत, खेळाडूंना विश्रांती देत असल्याचे देखील रोहितने सांगितले. सध्या भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह श्रेयस अय्यर हे गंभीर दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत.”